खरीप हंगामात अक्षरशा अवकाळी पावसाने त्राहिमाम् माजवला होता यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले होते. या दुःखातून कसातरी बळीराजा सावरला आणि रब्बी हंगामाकडे वळला. मात्र रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गाची अवकृपा बघायला मिळाली, हंगामाच्या सुरवातीला अवकाळी पावसाचे सावट होते त्यावेळी शेतकरी बांधवांनी योग्य नियोजनाने रब्बीची पिके वाचवली आता रब्बी हंगाम आगामी काही दिवसात संपुष्टात येणार आहे आणि अशातच राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट निर्माण होत बघायला मिळत आहे.
शेतकरी बांधवांनी खरिपात नुकसान झाले म्हणून रब्बीमध्ये हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली, रब्बी हंगामात असलेले पोषक वातावरण हरभरा पिकासाठी फायदेशीर असल्याने या हंगामात मोठ्या प्रमाणात हरभरा लागवड बघायला मिळत आहे. मात्र हरभरा पेरणी केली आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली होती त्यावेळी अवकाळी पावसाचा एवढा मोठा फटका बसला नव्हता मात्र आता हरभऱ्याची काढणी आणि मळणी सुरू असतानाच अवकाळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे. राज्यातील मराठवाड्यात आत्तापासूनच मेघराजाची वर्दळ बघायला मिळत आहे, मराठवाड्यात तयार झालेले ढगाळ वातावरण आधीच शेतकऱ्यांना चिंताग्रस्त बनवत होती आणि त्यात आता पंजाबराव डख साहेबांची येत्या काही दिवसात अवकाळी पाऊस येणार अशी भविष्यवाणी शेतकऱ्यांची झोप उडवण्यासाठी पुरेशी आहे.
सध्या लातूर जिल्ह्यात समवेतच संपूर्ण मराठवाड्यात हरभरा काढणीची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र सहा मार्च रोजी अवकाळी पाऊस हजेरी लावणार असे राज्यातील हवामान तज्ञ यांनी नमूद केल्यामुळे शेतकऱ्यांची रातों की निंद हराम झाली आहे. पंजाबराव डख साहेबांचा हवामान अंदाज समोर येताच शेतकरी बांधवांनी हरभरा तसेच गव्हाची काढणी आणि मळणी करण्यासाठी गती पकडली आहे. हरभरा आणि गव्हाची लवकरात लवकर काढणी करून शेतकरी राजा शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी धडपड करत आहे. या हंगामात सुरूवातीचा अवकाळी पावसाचा काळ वगळता सर्व काही पोषक होते त्यामुळे शेतकरी राजांना उत्पादनात भरीव वाढ होण्याची शक्यता आहे, म्हणून आता हातातोंडाशी आलेला घास वाया जाऊ नये यासाठी शेतकरी राजा प्रयत्न करीत आहे.
पाऊस कुठं-कुठं कोसळणार- पंजाबराव डख साहेबांनी नुकताच मराठवाड्यात अवकाळी पाउस हजेरी लावणार असा अंदाज जाहीर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात सकाळी आणि संध्याकाळी ढगाळ वातावरण बघायला मिळते. हे ढगाळ वातावरण शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटीच होती, कारण आता हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सऱ्या बसणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. शेतकरी राजाने गेली चार महिने रब्बीतील पिकांची अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासना केली आहे आणि म्हणुन आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी राजा शर्तीची पराकाष्टा करत आहे.
Share your comments