आज गुरुवार अर्थात 12 मे रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या ताजा अंदाजानुसार, विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्र वगळता राज्यातील इतर भागात नागरिकांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळणार असल्याचा अंदाज आहे.
मित्रांनो गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक पुणे मराठवाड्यातील औरंगाबाद आणि विदर्भातील नागपूर मध्ये तसेच राजधानी मुंबईमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळाले यामुळे तापमानात घट झाली आहे.
यामुळे मुंबई पुणे आणि त्यानंतर औरंगाबादसह अनेक ठिकाणी उष्णता कमी झाली आहे. दुसरीकडे, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) विदर्भात 13 ते 15 मे दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली असल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनता उकाड्याने त्रस्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यानंतर मात्र वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे, हवामानाचा पॅटर्न बदलेल आणि ढग तयार होण्यास सुरुवात होतील अशी आशा तज्ञांनी व्यक्त केली आहे.
यामुळे महाराष्ट्रावर असणारा सूर्य देवाचा प्रकोप कमी होणार आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया 12 मे रोजी कसं असेल महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील तापमान.
राजधानी मुंबई: आज गुरुवारी 12 मे रोजी राजधानी मुंबईत जास्तीत जास्त तापमान 34 आणि कमीत कमी तापमान 27 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
आज सकाळी हवामान निरभ्र झाले असून दुपारनंतर राजधानी मुबंईत पुन्हा एकदा हलक्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे.
पुणे शहर आजचा हवामान अंदाज: आज गुरुवार 12 मे रोजी पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात जास्तीत जास्त तापमान 38 तर कमीत कमी तापमान 25 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
आज पुण्यातील हवामान सकाळी निरभ्र बघायला मिळाले मात्र दुपारनंतर पुण्यात देखील ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते.
नागपूर शहर हवामान अंदाज: विदर्भातील नागपुरात आज 12 मे रोजी जास्तीत जास्त तापमान 42 अंश सेल्सिअस तर कमीत कमी तापमान 26 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
मुंबई-पुणे प्रमाणेच विदर्भातील नागपूर मध्ये देखील ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते.
नाशिकचा आजचा हवामान अंदाज: नाशिकमध्ये आज 12 मे रोजी जास्तीत जास्त तापमान 40 अंश सेल्सिअस तर कमीत कमी तापमान 24 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
नासिक मध्ये देखील राजधानी मुंबई पुणे नागपूर सारखेच वातावरण बघायला मिळणार आहे. म्हणजेचं नासिक मध्ये देखील दुपारनंतर ढगाळ वातावरण राहणार आहे.
काय म्हणतं औरंगाबादचं हवामान : मराठवाड्यातील प्रमुख शहर औरंगाबादमध्ये आज 12 मे रोजी जास्तीत जास्त तापमान 42 अंश सेल्सिअस तर कमीत कमी तापमान 28 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा भारतीय हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
औरंगाबाद मध्ये देखील इतर शहरांप्रमाणे दुपारनंतर ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते.
Share your comments