एका शरद पवार (sharad pawar) प्रेमींने बैलाच्या अंगावर 'आम्ही साहेबांच्या सोबत'ची कलाकारी केली आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांबवेमधील शेतकऱ्याने ही कलाकारी केली आहे. बेंदूर सणाचे औचित्य साधून या शेतकऱ्याने हे केले आहे. रविवारी अजित पवारांनी शरद पवार यांची साथ सोडत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर विविध ठिकाणाहून लोक शरद पवार यांना पाठिंबा देत असून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. वाळवा तालुक्यातील तांबवे गावच्या बैलप्रेमींनी बेंदूर सणाचे औचित्य साधून बैलांच्या अंगावर रंगरगोटीद्वारे आम्ही साहेबांच्या सोबत आहोत असे लिहिले आहे. यामुळे याचे फोटो व्हायरल होत आहेत.
वाळवा तालुक्यातील आनंदराव गावडे यांनी बेंदुर सणाच्या निमित्तानं त्यांच्या कँप्टन आणि पल्सर या बैलांच्या अंगावर आम्ही साहेबांच्यासोबत अशी कलाकृती केली आहे. एका साईडला विठ्ठल आणि दुसऱ्या साईडला शरद पवार यांची छबी रेखाटली आहे. त्यावर आम्ही साहेबांच्या सोबत असे लिहिले आहे.
एका अंड्याची कमीत चक्क १०० रुपये, जाणून घ्या काय आहे खासियत..
असे असताना या मजकुराची आणि बैलांची चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर विविध ठिकाणाहून लोक शरद पवार यांना पाठिंबा देत असून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
या राज्यात आता देशी गायींच्या संगोपनासाठी योगी सरकार देणार ४० हजार रुपये
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील असेच केले यानंतर देखील बैलांवर अनेकांनी गद्दार असे लिहिले होते. यामुळे याची देखील बरीच चर्चा झाली होती. तसेच तसेच त्यावेळी ५० खोके एकदम ओके असे लिहिले होते. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
टोमॅटोने केला कहर! दिल्लीत टोमॅटो 160 रुपये किलो....
आज जागतिक फणस दिवस, जाणून घ्या फणसाचे आरोग्यासाठीच फायदे
ब्रेकिंग! राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड, अजित पवारांनी खासदाराची केली नेमणूक
Share your comments