राज्याचा विचार केला तर मागच्या आठवड्यापासून तीव्र उष्णता जाणवत असून ही उष्णतेची लाट अजून पुढचे तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भामध्ये काल उष्णतेने लाहीलाही झाली असून काल अकोला येथे सर्वाधिक 42.7 अंश तापमानाची नोंद झाली.
त्या तुलनेने कोकण परिसरात गेल्या दोन दिवसापासून उष्णतेची लाट कमी झाली असूनत्याला कारण म्हणजे समुद्रावरून वाहणारे वारे हे आहे.त्या तुलनेने विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात गोष्ट त्याची तीव्र लाट असूनअगदी सकाळी सकाळी देखील कडक उन्हाचा फटका जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूरतसेच सांगलीत देखीलकमल तापमानामध्ये वाढ झालेली आहे.
उन्हाची तीव्रता वाढण्याचे कारण
ही निर्माण झालेली उष्णतेची लाट अँटीसायक्लोन मुळे असण्याची शक्यता आहे. यामध्ये हवा खाली जाते तशी तशी ती गरम होते आणि कोरडे हवामान आणते. यामध्ये समुद्राच्या वाऱ्याला किनारपट्टीच्या भागात जाण्यासाठी ही कोरडी हवा प्रतिकार करते त्यामुळेउन्हाच्या तीव्रतेत वाढ होते.
असनी चक्रीवादळाचा धोका
यासोबतच मध्य बंगालच्या उपसागरावर सोमवारी चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
या अंदाजानुसार बंगालचा उपसागर व अंदमान आणि निकोबार बेटांवर वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मच्छीमारांना 17 ते 21 मार्च पर्यंत बंगाल उपसागराच्या परिसरात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
केंद्रीय गृहसचिव आणि अंदमान आणि निकोबार प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला असून गृहमंत्रालयाने पोर्टब्लेअर मधे एक राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तैनात करण्यात आले आहे.आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र आज एका चांगल्या कमी दाबाचे क्षेत्रात परावर्तीत होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला.
कमी दाब अंदमान आणि निकोबार बेटांची बाजूने कमी दाबाचे क्षेत्र अंदमान आणि निकोबार बेटांची बाजूने आणि जवळ जवळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे आणि 20 मार्च ला सकाळ पर्यंत तीव्रतेत आणि 21 मार्चला चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला श्रीलंकेने असनी असे सुचवले आहे.
Share your comments