गेली दोन वर्षे संपूर्ण देशात कोरोना नामक संकट पसरलेले होते यामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसला होता. कोरोना मुळेगत दोन वर्ष कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना आपले कलिंगड बाजारात देखील नेणे शक्य झाले नव्हते. यामुळे कलिंगड उत्पादक शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता.
यावर्षी गत दोन वर्षांची भरपाई निघेन अशी भोळी भाबडी आशा उराशी बाळगून कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा पुन्हा नव्या जोमाने कलिंगड पिकाची लागवड केली होती. कलिंगड पिकाची लागवड केली कलिंगडचे यशस्वी उत्पादन देखील घेतले मात्र हंगामाच्या सुरुवातीला मिळत असलेला उच्चांकी दर अवघ्या पंधरा दिवसात लक्षणीय खाली आल्याने कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा वाटोळे ठरलेलंचं आहे.
हेही वाचा :
काय मिळाले! अज्ञात माणसाने अडीच एकर टरबूज शेती वर फवारले कीटकनाशक; लाखोंचे नुकसान
Cotton: मे महिन्यात यावेळी लागवड करा कापुस आणि मिळवा दर्जेदार उत्पादन
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, कलिंगडची हंगामाच्या सुरुवातीला जवळपास 15 ते 16 रुपये प्रति किलो या दराने विक्री होत होती. मात्र सध्या तापमानात मोठी वाढ असताना शिवाय रमजानचा पवित्र महिना सुरू असताना देखील कलिंगडला अतिशय कवडीमोल दर मिळत असल्याने कलिंगड उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, यावर्षी कलिंगडचे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाल्याने सध्या बाजारपेठेत कलिंगडची मोठी आवक आहे आणि यामुळे कलिंगडच्या दरात मोठी घसरण बघायला मिळत आहे.
लातूर आणि वाशिम जिल्ह्यातील बाजारपेठेत सध्या कलिंगडला आठ ते दहा रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. सध्या मिळत असलेल्या दरात उत्पादनखर्च काढणे देखील अशक्य असल्याचे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे चार पैसे पदरी पडतील या आशेने केलेला कलिंगड लागवडीचा शेतकऱ्यांचा हा प्रयोग फसताना दिसत आहे. बाजारपेठेत शेतमालाच्या बाबतीत असलेली अस्थिरता या प्रकरणावरून उघडकीस आली असून बाजारपेठेतील सर्व गणित केवळ आवक वरच अवलंबून असते हे स्पष्ट झाले आहे.
गेली दोन वर्ष कोरोनामुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तरीदेखील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने याहीवर्षी कलिंगडची लागवड केली विशेष म्हणजे यावर्षी लागवडही केली आणि उत्पादन देखील भरमसाठ मिळवले.
हंगामाची सुरुवात देखील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली होती कारण की हंगामाच्या सुरुवातीला कलिंगडला 15 ते 16 रुपये प्रति किलो असा दर मिळत होता यामुळे गेल्या दोन वर्षाची नुकसान भरपाई काढली जाईल अशी आशा कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना होती.
मात्र सध्या कलिंगडला अतिशय कवडीमोल दर मिळत असल्याने दोन वर्षांची नुकसानभरपाई तर सोडाच पण या वर्षी केलेला उत्पादन खर्च काढणे देखील अशक्य असल्याचे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. निश्चितच कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना याहीवर्षी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे.
Share your comments