सातारा : अवकाळी पाऊस, गारपीठ या सारख्या संकटांमुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. त्याचबरोबर शेतीमालाला योग्य तो बाजार भाव मिळत नाही. नैसर्गिक संकंटामुळे उत्पनात घट होत आहे. शेतात एखाद्या पिकात फायदा झाला नाही तर लगेच दुसऱ्या पिकाचा विचार करतो. मात्र, नुकसानीनंतरही धाडस केल्यास काय होऊ शकते हे यंदा कलिंगड (Watermelon) उत्पादक शेतकरी यांनी दाखवून दिले आहे.
कलिंगड हे हंगामी पीक आहे. गेली दोन वर्ष कलिंगडच्या सजिनमध्येच लॉकडाऊन सुरु होता. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला. सलग दोन वर्ष तोटा झाला त्यामुळे यंदा कलिंगडाची लागवड कमी झाली.
शेतकरी मालामाल
आता बाजारपेठा पूर्ण क्षमतेने खुल्या झाल्या आहेत तर वाढत्या उन्हामुळे कलिंगडच्या मागणीत वाढही झाली आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. कलिंगड खरेदीसाठी व्यापारी थेट बांधावर येत असून कलिंगडला 12 ते 14 रुपये किलोचा दर मिळत आहे. त्यामुळे यंदा ज्या शेतकऱ्यांनी धाडस केले ते मालामाल होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
Gudi Padawa : पाडव्याचा मुहूर्त आणि शेतकरी यांचं जिव्हाळ्याचे नातं; जाणून घ्या या बद्दल...
रशिया-युक्रेन युध्दामुळे शेतकरी होणार मालामाल; 'या' शेतीमालाच्या मागणीत वाढ
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील काले गावच्या संदिप थोरात यांनी एक एकर कलिंगड लागवड केली होती. यांना 60 दिवसात पिकही जोरदार आले असून २५ टन उत्पन्न अपेक्षित आहे. पहिल्या तोडणीत प्रत्येक कलींगड फळ वजनाला चार किलोपेक्षा जास्त भरते आहे. शेतात जागेवर 10 ते 12 रुपये प्रति किलो दर मिळतोय त्यांच्या कलिंगडाला राज्याबाहेरील बाजारपेठातुन मागणी वाढली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
Share your comments