MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

शेतकरी धर्मसंकटात! आधी अवकाळी, गारपिटीमुळे मुख्य पिकांना फटका आता कोरोना नामक ग्रहणामुळे नगदी पीकही कवडीमोल

अक्कलकोट: खरीप हंगामात (In the kharif season) अतिवृष्टीचे संकट होते तर आता रब्बी हंगामात अवकाळी पाऊस व गारपीटीचे (Untimely rain and hailstorm) संकट कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी अल्पकालावधीत काढण्यासाठी येणाऱ्या पिकांच्या लागवडीवर विशेष लक्ष केंद्रित केले. कमी वेळेत हात खर्चाला पैसे येतील या आशेने शेतकरी बांधवांनी भाजीपाला वर्गीय पिकांची तसेच वेलवर्गीय फळबाग पिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात शेतकरी बांधवांनी कलिंगडाची लागवड (Watermelon cultivation) केली. दोन महिन्यातच काढण्यासाठी येत असल्याने शेतकरी बांधवांनी या पिकाची विशेष काळजी घेतली. तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकाची जोपासनी केली आणि पिकातुन दर्जेदार उत्पादन प्राप्त केले.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
watermelon cultivation

अवघ्या 60 दिवसात कलिंगडाचे पीक तयार होते म्हणुन पिकावर रोगाचे सावट दिसताच लागलीच फवारणी करणे योग्य खत व्यवस्थापन करणे तसेच पाणी व्यवस्थापन करणे या सर्व गोष्टींची योग्य दक्षता घेऊन शेतकऱ्यांनी कलिंगडाचे उत्पादन (Production of watermelon) पदरी पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्या देशात तसेच राज्यात कोरोना नामक महाभयंकर आजाराची (Corona) तिसरी लाट पुन्हा एकदा त्राहिमाम् माजवत आहे, याचा सर्वात जास्त फटका शेतकरी बांधवांना बसत आहे. अक्कलकोट (Akkalkot) परिसरातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना देखील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका बसत आहे. सध्या वावरात पूर्ण परिपक्व झालेले कलिंगड खरेदी करण्यासाठी व्यापारी उत्सुक नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कोरोनामुळे कलिंगड विक्रीसाठी अडथळे निर्माण होत असल्याचे व्यापाऱ्यांद्वारे सांगितले जात आहे. साधारणता उन्हाळ्याच्या सुरुवातीला कलिंगड बाजारात दाखल होते मात्र कोरोनामुळे अद्यापही परिपक्व झालेले कलिंगड वावरातच पडलेले आहेत. त्यामुळे पीकपद्धतीत बदल करण्याचा शेतकऱ्यांचा हा धाडसी प्रयोग पूर्णता फसल्याचे बघायला मिळत आहे. सध्या व्यापारी कोरोनाचे निमित्त करून अवघ्या दोन तीन रुपयात कलिंगड ची मागणी करत आहेत. शेतकऱ्यांच्या मते, जर अशा कवडीमोल दरात कलिंगडची विक्री केली तर उत्पादन खर्च काढणे देखील मुष्कीलेचे होऊन बसेल.

60 दिवसात काढणीसाठी येणाऱ्या कलिंगड पिकाला अक्कलकोट परिसरातील शेतकऱ्यांनी एकरी 60 हजार रुपयेपर्यंतचा खर्च केला, हमीचे पीक असल्याने खर्च वजा जाता चार पैसे खिशात पडतील अशी शेतकर्‍यांची आशा होती. मात्र कोरोनामुळे कलिंगड पिकाला मागणी नसून आता कलिंगड विक्रीसाठी शेतकऱ्यांना खूप मोठा अडथळा निर्माण होत आहे. मुख्य पिकाचे नुकसान झाले म्हणून अल्प कालावधीत तयार होणारे पीक लागवड करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला मात्र शेतकऱ्यांचा हा प्रयोग पूर्णता फसला आहे. आता नव्याने कलिंगड लागवड करण्याचे धाडस शेतकऱ्यांना होत नसल्याचे चित्र परिसरात बघायला मिळत आहे. अक्कलकोट परिसरातील शेतकऱ्यांनी कलिंगड लागवड करून अहोरात्र कष्ट केले एकरी पन्नास हजार रुपयांपर्यंतचा खर्च केला मात्र आता कोरोनाचे निमित्त करून कलिंगड ला फक्त दोन ते तीन रुपये किलो प्रमाणे व्यापाऱ्यांकडून मागणी होत आहे. 

त्यामुळे बाजारपेठेतील हे चित्र बघता शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देखील कलिंगड हे वावरातच सडले होते आणि आता अशीच काहीशी परिस्थिती तिसर्‍या लाटेत उद्भवली असल्याचे समजत आहे. अक्कलकोट परिसरातील शेतकऱ्यांनी कलिंगड लागवड केली मात्र निसर्गाचा लहरीपणा कायम राहिल्याने कलिंगड लागवडीच्या उत्पादन खर्चात वाढ झाली. फवारणीचा खर्च वाढला तसेच अतिरिक्त श्रम देखील शेतकऱ्यांना करावे लागले मात्र एवढा आटापिटा करून देखील कवडीमोल दराने कलिंगडची मागणी होत असल्याने शेतकरी राजा पुरता बेजार झाल्याचे चित्र अक्कलकोट परिसरात बघायला मिळत आहे. 

English Summary: watermelon cultivation is damaged by corona farmers are in trouble Published on: 06 February 2022, 05:47 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters