सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष पावसाकडे लागले आहे. सध्या ऑगस्ट निम्मा संपला तरी राज्यातील प्रमुख धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत.
राज्यातील बहुतांश भागात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची गरज आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनीमधून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणं ७० टक्के बहरणार नाही तोवर उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडलं जाणार नाही.
नदीचे पाणी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे उजनीतून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आल्याची माहिती लाभ क्षेत्र विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामुळे येणाऱ्या काळात पाऊस पडला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे.
10 गुंठे जमिनीच्या खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा, तुकडाबंदी कायद्यात बदल
उजनी धरणात सध्या १३ टक्के पाणीसाठी आहे. खडकवासला, कळमोडी, कडीवळे या धरणातून दौंडवरून उजनीत पाणी सोडले जाते. परंतु ही धरणं भरली नसल्याने उजनीतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. यामुळे उजनी भरण्यास अडचणी येतात.
अखेर शेतकऱ्यांसाठी ती बातमी आलीच! आता शेततळ्यासाठी अर्ज सुरु, जाणून घ्या कुठे आणि कसा करायचा अर्ज...
गेल्यावर्षी १२ ऑगस्टला उजनी धरण १०१ टक्के भरले होते. तसेच गेल्यावर्षी १५ ऑगस्टपासून ४५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडला होता. आता ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने उजनी धरणात पाणी साठा वाढलेला नाही.
पांढऱ्या कांद्याची शेती उघडणार शेतकऱ्यांचे नशीब, जाणून घ्या शेतीची योग्य पद्धत
Share your comments