1. बातम्या

राज्यातील धरणांमध्ये मागील वर्षाइतका पाणीसाठा

मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून महिन्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावली. मात्र जुलै महिन्यात धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर पावसाने दडी दिली . त्यामुळे राज्यातील प्रमुख धरणांत अद्यापही समाधानकारक पाणीसाठा झालेला.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर  जून महिन्यात पावसाने सर्वत्र हजेरी लावली. मात्र जुलै महिन्यात धरणाचे पाणलोट क्षेत्र  असलेल्या सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर पावसाने दडी दिली, . त्यामुळे राज्यातील प्रमुख धरणांत अद्यापही समाधानकारक पाणीसाठा झालेला.  राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये यंदा तब्बल ५५२ टीएमसी  पाणीसाठा झाला असल्याचे राज्याच्या जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले.  विभागनिहाय पाणीसाठ्याचा विचार करता यंदा जून महिन्यात रादज्यातील विभागांमध्ये पाणीसाठा वाढू लागला, तर जुलै महिन्यात धरणांच्या पाणलोट पावसाने ओढ दिली.

दरम्यान यंदा मराठवाड्यात मुबलक पाऊस झाला आहे. मराठवाड्यात यंदा ३६ टक्के, पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात ३५ टक्के, पूर्व विदर्भाच्या नागपूर विभागात ५० टक्के, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागात सुमारे ५ टक्के पाणीसाठा आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागात ३५ टक्के आणि कोकण विभागात ५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाले असल्याचे अहवालावरून दिसून येते. घाटमाध्यावरील मुख्य धरणांच्या क्षेत्रात पावसाने दडी मरूनही मराठवाडा, वऱ्हाड, खानदेशात झालेल्या पावसामुळे राज्याचा पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे राज्यात यंदा गतवर्षी एवढाच पाणीसाठा झाल्याचे दिसून येत आहे. मात्र पुणे आणि नाशिक विभागातील  धरण जोरदार पावसाची आवश्यकता आहे. मॉन्सूनचा निम्मा हंगाम संपल्याने दोन महिन्यांच्या कालावधीत नगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.

दरम्यान  मराठावाड्यात यावर्षी सातत्याने जोरदार पाऊस पडत असल्याने पाणीच पाणी असल्याचे चित्र आहे.  मागील वर्षी ०.९८ टीएमसी पाणी असलेला मराठावाड्यातील ९६४ लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये यंदा तब्बल ९३.७९ टीएमसी (३६ टक्के)  पाणीसाठा आहे. विभागातील मोठ्या ४५ प्रकल्पांमध्ये ६७.७८ टीएमसी (४८ टक्के) मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये  ९.०२ टीएमसी (२४ टक्के), तर लहान ८३८ प्रकल्पांमध्ये ७.९९ टीएमसी (१३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. दरम्यान पुणे विभागातील सर्वात मोठे प्रकल्प यावर्षी रिकामीच आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, या पाच जिल्ह्यामधील प्रमुख धरणांमध्ये  सध्या १८७.१० टीएमसी (३५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. यावर्षी  मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास १४ टक्के पाणीसाठा कमी आहे.

नाशिक विभागात पाऊस चांगला झाल्याने या विभागातील लहान मोठे जलाशय भरले आहेत. मात्र नगर आणि नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुलै महिन्यात कमी पाऊस झाला. अजून धरणांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. मागील वर्षा इतकेच नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा जमा झाला आहे. विभागातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून ७४.१२ टीएमसी (३५ टक्के ) उपयुक्त पाणीसाठा आहे. कोकण विभागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने अपेक्षित हजेरी लावल्याने कोकण विभागात यंदा गतवर्षीच्या तुलनेत ३४ टक्के कमी पाणीसाठा आहे.

पूर्व विदर्भात यावर्षी चांगला पाऊस आहे, नागपूरातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यातील धरणांमध्ये मिळून ८१.३६ टीएमसी (५०टक्के) पाणीसाठा झाला आहे.  पश्चिम विदर्भातही जोरदार पाऊस झाला आहे.  अमरावती विभागात ५२.५४ टीएमसी (३५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत जवळपास तिप्पट पाणीसाठा अमरावती विभागात आहे. मागील वर्षी  १३ टक्के पाणीसाठा होता.

English Summary: Water storage in dams in the state is the same as last year Published on: 03 August 2020, 05:52 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters