यंदा राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवल्याने शेतकरी हैराण झाला आहे. तर काल पडलेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला. अवकाळी पावसासह सततच्या हवामान बदलामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी, सीताफळ, पेरू, आंबा, काजू यासह अन्य फळबागांची शेती धोक्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील पुळूज परिसरातील फळबागांना पावसाने चांगलेच झोडपून काढले.
पुळूज व परिसरात सुमारे हजारो एकरावरील द्राक्षबागा अवकाळी पावसाने धोक्यात आल्या असून डाळिंब बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. तर आलेल्या संकटाच्या डोळ्यात डोळे घालून पुन्हा द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. परंतू रविवार पहाटेपासून पावसाचा जोर वाढून सलग आठ तासाहून अधिक काळ पाऊस सुरू होता. संततधार पावसामुळे द्राक्ष घडात पाणी शिरून कुजवा आणि दावण्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सतत लागून राहिलेल्या पावसाने अनेक ठिकाणी द्राक्ष गळून पडली आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊन आर्थिक नुकसान होणार असल्याची शक्यता द्राक्ष उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत. या पावसाचा सर्वाधिक फटका पुळूज, पुळूजवाडी, शंकरगाव, टाकळी सिकंदर, फुलचिंचोली, विटे, सरकोली, या भागातील द्राक्षबागांना बसला. सध्या द्राक्ष हंगाम सुरु असून हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हताश पहायला मिळाला.
या अवकाळी पावसानी कुजव्या, करपा, डावण्या, घड जिरणे, आदी संभाव्य रोगांपासून बागा वाचविताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. शिवाय फवारण्यांचा खर्च वाढणार असून पावसाने शेतात साठलेल्या पाण्याने पिकांची वाढ खुंटणार आहे. रोगांचे प्रमाण वाढून त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे हजारो एकर द्राक्ष बागांचे सरासरी कोट्यवधींचे नुकसान झाले असून सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो विक्रेत्यांनी खताचा साठा केल्यास माहिती द्या, साठा आढळल्यास जिल्हाधिकारी कारवाई करणार..
अवकाळी पावसाचा धुमाकूळ; वीज कोसळून तीन गायींचा बळी
Sugarcane; उसाच्या खोडव्याचे टनीज का घटतय? शेतकऱ्यांनो असे करा व्यवस्थापन...
अखेर पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याची तारीख ठरली! 'या' दिवशी होणार पैसे जमा..
Share your comments