सध्या रब्बी हंगामातील पेरण्या सुरु झाल्या आहेत. पेरणीपासूनच योग्य नियोजन केले तर पुढे उत्पादनात वाढ होत जाते. रब्बी हंगामातील पाण्याचे योग्य नियोजन हा सर्वात महत्वाचा भाग आहे. प्रत्येक पिकाला त्याच्या अवस्थेनुसार पाणी देणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे म्हणून देत राहणे हे देखील चुकीचे आहे. पाण्याचे व्यवस्थापन हे शेतजमिनीच्या दर्जानुसार ठरते. चांगल्या प्रतिच्या जमिनीला 18 ते 17 दिवसांच्या अंतराने, मध्यम जमिनीला 15 दिवसांच्या अंतराने, हलक्या जमिनीस 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या 8 ते 10 पाळ्या रब्बी हंगामात देणे गरजेचे असते.
ज्वारी -
ज्वारी हे रब्बी हंगामातील मुख्य पिक आहे. साधारणपणे 70 ते 75 दिवसांत ज्वारीला फुलोरा येतो. योग्य पाणी दिल्याने कणसाचे वजन वाढते व ज्वारीचा दर्जाही सुधारतो. पेरणीनंतर महिन्याभराने ज्वारीची वाढ जोमात असते. त्या दरम्यान पाणी दिले वाढ होण्यास अणखी मदत होते.ज्वारीच्या कणसात 90 ते 95 दिवसांनी दाणे भरण्यास सुरवात होते. त्यावेळी पाणी दिल्यास उत्पादनात वाढ तर होणार आहेच शिवाय काढणीच्या दरम्यान सोयीस्कर होणार आहे. शक्यतो तीन पाण्यातच ज्वारी पिक हे येते पण जिरायत क्षेत्रावर गरज भासल्यास चौथे पाणी द्यावे लागु शकते.
हरभरा -
जिरायती क्षेत्रात ओलावा खूप कमी असेल तर फुले येऊ लागताना पाणी देणे योग्य राहील. मध्यम प्रकारच्या जमिनीला पहिले पाणी 20 ते 25 दिवसांनी , 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरी पाणी द्यावे लागते . हरभऱ्यास प्रमाणशीर पाणी देणे अत्यंत महत्वाचे असते. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा मूळकुजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते. तर स्प्रिंक्लरने पाणी दिल्यास उत्पादन चांगली वाढ होते.
Share your comments