किडींमुळे तर पिकांच्या उत्पादनात घट होतेच जे की खोडकिडींमुळे डाळिंबाच्या बागा न बागा उध्वस्त झालेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान आता झाले आहे. ज्या भागात डाळिंबाचे जास्त प्रमाणात क्षेत्र आहे त्याच भागात किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. अजूनही यावर तोडगा निघालेला नाही. डाळिंबाच्या झाडावर जर किडीचा प्रादुर्भाव झाला की एक तर डाळिंबाचे झाड जाग्यावर तरी जळून जाते नाहीतर तोडावे तरी लागते. यंदा डाळिंबाच्या झाडावर खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे. मागील दोन महिन्यांपासून डाळिंब निर्यातीची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत ५०० टन डाळिंबाची निर्यात झालेली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्र :-
डाळिंब पिकासाठी कोरडवाहू शेती फायद्याची ठरते त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुका तसेच इतर भागातही डाळिंबाचे पीक घेतले जाते. डाळींबाला जास्त पाणी ही लागत नाही. भारतात डाळिंबाचे क्षेत्र सुमारे २ लाख ८० हजार हेक्टरवर आहे तर यापैकी १ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र एकट्या महाराष्ट्र राज्यात आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक राज्यात सुदधा डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते.
खोडकिडीमुळे नेमके काय होते?
डाळिंबाची बाग बहरत असतानाच खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही योग्य निर्णय घेता येत नाही. डाळिंबाच्या बागेवर जर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला की एक तर झाड तरी जाग्यावर जळते किंवा झाड उपटून तरी काढावे लागते. जर तुम्ही असे केले नाही तर दुसऱ्या झाडांवर सुद्धा याचा प्रादुर्भाव होतो आणि अगदी काही दिवसातच पूर्ण बाग नष्ट होते.
कशामुळे बदलले चित्र?
पोषक वातावरण असल्याने सांगोला तालुक्यातील डाळिंब परदेशात पोहचली आहे. डाळींब पिकाला हवे तसे पोषक वातावरण भेटल्यामुळे तालुक्यात ३५ हजार क्षेत्रावर डाळिंबाच्या बागा फुलत आहे. परंतु वातावरणाच्या बदलामुळे पहिल्यांदा बागेवर तेल्या रोग नंतर मर रोग आणि शेवटी खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला असल्याने डाळींबाचे चांगलेच नुकसान झाले आहे. या किडीवर अजूनही औषध उपलब्ध नसल्यामुळे पूर्ण झाड च जळून खाक होत असल्याचे चित्र पाहायला भेटत आहे.
Share your comments