1. बातम्या

कोकण , मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठावाड्याला सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी परतीच्या पावासाने जोरदार तडाखा दिला. सोलापूर, लातूर, आणि उस्मानाबादमध्ये ढगफुटीसारखा धो-धो पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळाची तीव्रता कमी झाली आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठावाड्याला सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी परतीच्या पावासाने जोरदार तडाखा दिला. सोलापूर, लातूर, आणि उस्मानाबादमध्ये ढगफुटीसारखा धो-धो पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळाची तीव्रता कमी झाली आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भाग व उत्तर कर्नाटककडून अरबी समुद्राकडे सरकले आहे. दरम्यान अरबी समुद्राच्या पश्चिममध्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे.

आज कोकणातील ठाणे, पालघर, मुंबईल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड. सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावासाचा जोर अधिक होता. सोलापूर, सातारा, आणि सांगलीत जोरदार पाऊस झाला आहे. पुढील १२ तासात कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर कमी होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्गाला रेड अलर्ट दिला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी तीव्रतेचे चक्रीवादळ आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्यावरुन जमिनीवरून उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्राच्या भागावरुन अरबी समुद्राकडे गेले आहे. त्यामुळे राज्यातही काही प्रमाणात वेगाने वादळी वारे वाहत होते.

उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा परिसरातील पश्चिम उत्तर भागात ताशी १३० किलोमीटर तर तेलंगणातील हैदराबाद पश्चिम भागात ताशी ५० किलोमीटर वेगाने वारे होते. आज गुजरात्या दक्षिण भागात व उत्तर कोकणात आणि अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होणार आहे. दरम्यान अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढणार असल्याने राज्यात ऑगस्टमध्ये पडतो. तसा सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. १८ ऑक्टोबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून त्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे.

English Summary: Warning of torrential rains in Konkan, Central Maharashtra Published on: 15 October 2020, 09:57 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters