राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आज विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उद्यापासून पुढील दोन ते तीन दिवस पुन्हा सर्वदूर जोरदार पाऊस पडेल. कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
तर उद्या मध्य महाराष्ट्राचा काही भाग वगळता कोकण, घाटमाथ्यावर आणि मराठावाड , विदर्भात जोरदार पाऊस पडेल. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार असून अनेक भागात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान आज बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यासह मध्य भारतात समुद्र सपाटीपासून ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर पुर्व- पश्चिम वाऱ्याचे जोड क्षेत्र आहे. गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती अजूनही कायम आहे. तसेच मध्य प्रदेशच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती असून ती समुद्रसपाटीपासून ५८ किलोमीटर उंचीवर आहे.
दरम्यान मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. कोकणतातील बहुतांशी भागात अतिवृष्टी, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठावाडा, विदर्भात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. आज मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठावाड्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.
Share your comments