जो पर्यंत शेतात माल असतो तो पर्यंत शेतकरी त्याचा मालक. एकदा की हा माल बाजारात पोहचला की त्याचा ठराव करण्याचा अधिकार व्यापाऱ्याचा असतो. माल काढला की साठवणुकीचा प्रश्न समोर येतो त्यामुळे शेतकरी तो माल सरळ बाजारात घेऊन जातो आणि आहे त्या दरात विकून टाकतो. शेतमाल साठवणुकीसाठी वखार मंडळाने तशी सोय सुद्धा केली आहे तसेच कर्ज सुद्धा मिळते परंतु याबद्धल माहीत नसल्याने आता वखार मंडळाने एक उपक्रम राबिवला आहे. आपल्या दरी हे अभियान राबिवले आहे. जवळपास १५ जिल्ह्यात हे अभियान राबिवले असून सोमवार पासून हा उपक्रम पहिल्यांदा उस्मानाबाद जिल्ह्यातुन होणार आहे.
फायदा शेतकऱ्यांना होईल:
शेतकरी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतो मात्र त्यांच्या मालाला योग्य असा भाव मिळत नाही. सध्या सोयाबीन पिकाची अंतिम टप्यातील मळणी सुरू आहे. बाजारात सोयाबीन ला बाजारात कसलाच दर नाही तरी विक्री करावी लागत आहे. मालाची साठवणूक केली आणि योग्य दर येऊन जर विकला तर याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. साठवणुकीचे कारण सांगून शेतकरी माल विकत आहेत. वखार महामंडळाने याची सोया केली असून ते शेतकऱ्यांना माहीत व्हावे म्हणून १५ जिल्ह्यांमध्ये आता कार्यशाळा घेण्यात आलेली आहे.
सोमवारपासून (25 ऑक्टोंबर ) कार्यशाळेला सुरवात:
सोमवारी उस्मानाबाद येथून कार्यशाळा सुरू होणार आहे आणि मंगळवारी लातूर येथे पार पडणार आहे. नंतर नांदेड, परभणी, वाशीम, खामगाव (बुलढाणा), अकोला, दर्यापूर (अमरावती), यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अर्जुनी मोरगाव (गोंदिया), तुमसर (भंडारा) या सर्व जिल्ह्यात कार्यशाळा पार पडणार आहे.
कार्यशाळेत काय होणार मार्गदर्शन?
कमी दर असलेल्या पिकाची तुम्ही विक्री करू नका तर वखार महामंडळात साठवणूक केल्यास याचा फायदा काय होईल याबद्धल माहिती सांगण्यात येणार आहे. तसे ह शेतकऱ्यांना पैशाची गरज असेल तर तारण कर्ज याबद्धल सुद्धा माहिती सांगितली जाणार आहे. शेतमाल ची विक्री कधी करावी तसेच वखार महामंडळ साठवुनुक योजना याबद्धल माहिती दिली जाणार आहे.
शेतीमालावर मिळते कर्ज -
१. शेतमाल प्रकार - सुर्यफूल, सोयाबीन, तुर, उडिद, भात , करडई, मुग, हळद, चना या पिकांच्या बाजारभावतील ७५ टक्के रक्कम ही कर्ज म्हणून दिली जाते. परतफेड चा कालावधी ६ महिन्याचा असून त्यावर ६ टक्के व्याजदर आहे.
२. शेतमाल प्रकार - मका,ज्वारी, गहू, बाजरी या पिकांच्या बाजारभावतील ५० टक्के रक्कम ही कर्ज म्हणून दिली जाते. परतफेड चा कालावधी ६ महिन्याचा असून त्यावर ६ टक्के व्याजदर आहे.
३. शेतमाल प्रकार - काजू बी या पिकाच्या बाजारभावतील ७५ टक्के रक्कम ही कर्ज म्हणून दिली जाते. परतफेड चा कालावधी ६ महिन्याचा असून त्यावर ६ टक्के व्याजदर आहे.
४. बेदाणा या पिकाच्या बाजारभावातील ५० टक्के रक्कम ही कर्ज म्हणून दिली जाते. परतफेड चा कालावधी ६ महिन्याचा असून त्यावर ६ टक्के व्याजदर आहे.
Share your comments