सध्या शेतीची कामे ही ट्रॅक्टरच्या मदतीने मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. छोट्या मोठ्या गावातील अनेक शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहेत. तर अनेक जण ट्रॅक्टर घेण्याच्या विचारात आहेत. जर तुम्हीही ट्रॅक्टर घेऊन आपल्या शेतीची कामे लवकर पुर्ण करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी फार महत्वाची आहे.येणाऱ्या नवीन वर्षापासून महिंद्रा अँड महिंद्रा चे ट्रॅक्टरच्या किमतीत वाढ होणार असल्याची माहिती कंपनीने दिलेली आहे, परंतु किती वाढ होईल याबाबत कंपनीने काहीही सांगितले नाही.
परंतु नव्या वर्षात शेतकऱ्यांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे नक्की.महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी ने पुढच्या महिन्यापासून ट्रॅक्टरची किंमत वाढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कारण इनपुट कॉस्ट च्या प्रभावाला ऑफ सेट करण्यासाठी ट्रॅक्टरच्या किमतीत वाढ करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2019 पासून महिंद्रा च्या सर्व प्रकारच्या ट्रॅक्टरच्या किमतीत वाढ होणार आहे. तसेच कमोडीटी किमतीतील वाढ आणि इतर इनपुट कॉस्ट वाढल्याने ट्रॅक्टरचे किमतीत वाढ करण्याची गरज निर्माण झाली होती.
येणाऱ्या काही दिवसांमध्ये महिंद्राच्या वेगवेगळ्या मॉडेलच्या किमतींची माहिती दिली जाणार आहे. गेल्याच आठवड्यात महिंद्रा कंपनीने पुढच्या महिन्यापासून पॅसेंजर आणि कमर सेल विकल च्या वाढ करण्याची घोषणा केली होती. हे भाववाढ सर्व प्रकारच्या मॉडेल्स साठी लागू होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
Share your comments