सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत, राज्य सरकार कधीही पडेल अशी परिस्थिती सध्या समोर आली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही समर्थक आमदारांसह बंड केला आहे. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे शिवसेनेतलं 56 वर्षांमधलं सर्वात मोठं बंड असल्याची चर्चा आहे.
ते सुरतमध्ये गेले होते तेथून रात्री ते आमदारांसह सध्या आसाममध्ये आहेत, यामुळे ते नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्याबरोबर 40 आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. असे असताना काही आमदारांना बळजबरीने सूरतला नेल्याचा दावा शिवसेना नेत्यांनी केला आहे. कारण कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनाही सूरतला घेऊन जाण्यात येत होतं, पण मोठ्या शिताफीने कैलास पाटील हे गुजरात बॉर्डरवरून निसटले आहेत.
याबाबत माहिती अशी की, विधानपरिषद निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर आमदारांचे जेवण झाले. त्यानंतर अनेक आमदारांना सूरतला आणले गेले. यात आमदार कैलास पाटील देखील होते. असे असताना ठाणे ओलांडल्यानंतरही वाहनं थांबत नसल्याने कैलास पाटील यांच्या मनात संशय आला. त्यानंतर पुढे ही वाहने गुजरात सीमेवर थांबविण्यात आली. यावेळी कैलास पाटील लंघुशंकेचं कारण देत गाडीतून उतरले आणि तिथून निसटले.
टोमॅटोने दुष्काळच हटवला! वर्षात दुहेरी उत्पादनातून शेतकऱ्याने कमवले २ कोटी ५० लाख
कैलास पाटील यांनी चिखलातून वाट काढत काही वेळ प्रवास केला त्यानंतर त्यांनी एका दुचाकीस्वाराला विनंती करत रात्रीत पुढचा 2 किलोमीटरचा प्रवास केला. त्यांनी ट्रकला हात दाखवत दहिसर गाठले, तिथे त्यांनी आपला फोन सुरु केला आणि आपल्या वाहनाने थेट वर्षा बंगला गाठला. यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार बळजबरीने की स्वखुशीने आले आहेत, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता 'एक देश एक रेशन कार्ड', तुमच्या फायद्यासाठी देशभरात नवी योजना लागू
कारल्यातून लाखोंची कमाई! उत्पादनाबरोबरच वाढीव दराने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस
मुलींना सरकार देणार ५१ हजार रुपये, करा फक्त 'हे' काम
Share your comments