बारामती: मागील पाच दशकांपासून छोटे ट्रॅक्टर आणि टिलर्सच्या उत्पादनाच्या माध्यमातून अग्रेसर राहून कृषी क्षेत्राला सतत नाविण्यपूर्ण तंत्रज्ञान देणाऱ्या व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेड (व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स) ने ग्रो टेक नावाचे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी आणले आहे. त्या अंतर्गत खास ऊस उत्पादकांसाठी तंत्रसमृदध अशा छोट्या ट्रॅक्टरची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याच्या केंद्र सरकारच्या उद्दिष्टाला प्रत्यक्ष तंत्राच्या वापरातून बळकटी मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात नाविण्यपूर्ण ग्रो टेक तंत्रज्ञान खास ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करून त्यांचे उत्पादन वाढविणारे हे खास तंत्रज्ञान असून त्यामुळे ऊसावरच्या मजुरीचा खर्च, पाणी आणि इंधन आणि वेळ यांची बचत होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोठ्या एचपी ट्रॅक्टरच्या तुलनेत ग्रो टेकसाठी केवळ 50 टक्के इतकीच गुंतवणूक करावी लागणार आहे.
व्हीएसटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲटनी चेरूकरा म्हणाले की अथक प्रयत्न करून शेतकऱ्यांपर्यंत नाविण्यपूर्ण तंत्रज्ञान सोप्या पद्धतीने पोचविण्याचा व्हीएसटीचा प्रयत्न असतो. त्यामुळे शेतकऱ्याची उत्पादकता वाढतेच, शिवाय मजुरी, कृषी निविष्ठा, लागवड आणि काढणीच्या खर्चात बचत होते. भविष्यातही आम्ही पिकानुसार शेतकऱ्याची उत्पादनक्षमता कशी वाढीला लागेल यावरच लक्ष्य केंद्रीत करणार आहोत.
ग्रो-टेक तंत्राचा भाग असेल्या 'व्हीएसटी शक्ती विराट एमटी 270' या लघुट्रॅक्टरचे सादरीकरण करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हा ट्रॅक्टर म्हणजे ऊसशेतीच्या यांत्रिकीकरणाचं एक परिपूर्ण साधन असून त्यामुळे आधुनिक करताना खर्चात 20 टक्के बचत होते. इंधन कमी लागणे हे या ट्रॅक्टरचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. उच्च इंधन कार्यक्षमता असलेला हा ट्रॅक्टर 4 सिलिंडरच्या इंजिनने तयार करण्यात आला आहे. त्यात पॉवर स्टेअरिंगचा विकल्पही देण्यात आलेला आहे. ओआयबी, स्मार्ट हायड्रोलिक्स, अल्ट्रा कुलिंग रेडिएटर, 6 अधिक 2 गिअर्सचा मेश पद्धतीचा गिअर बॉक्स, ऑटोमॅटिक डेप्थ आणि ड्राफ्ट प्रणाली, आपल्या श्रेणीतल सर्वात चांगली अशी 2.1 मीटरची टर्निंग रेडिअस या वैशिष्ट्यांनी नटलेला हा ट्रॅक्टर ॲव्हरेजही चांगले देतो.
लहान आकाराची जमीन म्हणजे कमी उत्पादन आणि जास्त मजुरी असं समीकरण रूढ झालं आहे. मात्र व्हीएसटी शक्ती विराट एमटी 270 या दोन्ही समस्यांवर तोडगा काढण्याचे काम करतो. उच्च तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट साधनाचा वापर करून हा ट्रॅक्टर लहान शेतकऱ्याच्या मजुरीचा खर्च वाचवतोच शिवाय उत्पादकताही वाढविण्याचे काम करतो. याच कार्यक्रमात कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष जुझर सिंग वीर्क यांच्या हस्ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 45 एचपी आणि 50 एचपी उत्पादने सादर करण्यात आली, तसेच काही ग्राहकांना त्यांच्या चाव्याही प्रदान करण्यात आल्या. ही उत्पादने जास्त शक्तीची असली, तरी त्यांना कमी देखभाल खर्च लागतो. शिवाय शेती आणि मालवाहुकीसाठी त्यांचा वापर करता येतो, अशी वैशिष्ट्यही त्याची आहेत.
द्राक्ष आणि डाळींब उत्पादक शेतकऱ्यांसाठी फोर व्हील ड्राईव्ह असलेल्या आणि उच्चतम टॉर्क असलेल्या टॅक्टरची आवश्यकता असते. व्हीएसटीने आज असे हाय टॉर्क इंजिन असलेले मॉडेल बाजारपेठेत उतरवले असून 600 लिटर क्षमतेचा स्प्रेअरही त्यासोबत काम करतो. जास्त टॉर्क आणि इंधन बचत असे दुहेरी फायदे हे या मॉडेलचं वैशिष्ट्य आहे. दमदार टॉर्क आणि दमदार डिझेल क्षमता असलेला 'व्हीएसटी शक्ती एमटी 270 हाय टॉर्क' हा भारताचा अस्सल किफायतशीर ट्रॅक्टर आहे. व्हीएसटी शक्ती एमटी 270 मधील बॉनेटला नवीन रूप देण्यात आले आहे. याशिवाय विविध प्रकारच्या तांत्रिक सुविधा आणि देखणं रूप हे या ट्रॅक्टरचं आणखी एक वैशिष्ट्य आहे.
दरम्यान या प्रसंगी महाराष्ट्राचे उपमहाव्यवस्थापक नूर महंमद शेख म्हणाले की 'ग्रो टेक 27 एचपी हाय टॉर्क ट्रॅक्टर- इंडिया का विन विन ट्रॅक्टर' आणि उच्चतम एचपी ट्रॅक्टरचे एकाच व्यासपीठावर सादरीकरण करणे हा एक उत्सवी क्षण आहे. 'व्हीएसटी ग्रो टेक'ला आम्ही संपूर्ण भारतातील ऊस उत्पादकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Share your comments