1. बातम्या

ऊस शेतीच्या परिपूर्ण यांत्रिकीकरणासाठी व्हीएसटीचे ग्रो टेक तंत्रज्ञान

पुणे: टिलर आणि छोट्या ट्रॅक्टरच्या निर्मितीमधील अग्रणी आणि कृषी अवजारांमध्ये 50 वर्षांहुन अधिक काळ सेवा पुरवत असलेले व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेडने व्हीएसटी ग्रो-टेक सोल्युशन सादरीकरण केले आहे. कृषी क्षेत्रातल्या समस्या नवनवीन मार्गाने सोडविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या भारत सरकारच्या महत्वाकांक्षी उद्दिष्टाला अनुसरून ग्रो-टेक सोल्युशन ऊस शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणारी नवीन मालिका सादर करण्यात आली आहे. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत या 'ग्रो-टेक सोल्युशन्स'चे अनावरण करण्यात आले.

KJ Staff
KJ Staff


पुणे:
टिलर आणि छोट्या ट्रॅक्टरच्या निर्मितीमधील अग्रणी आणि कृषी अवजारांमध्ये 50 वर्षांहुन अधिक काळ सेवा पुरवत असलेले व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेडने व्हीएसटी ग्रो-टेक सोल्युशन सादरीकरण केले आहे. कृषी क्षेत्रातल्या समस्या नवनवीन मार्गाने सोडविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या भारत सरकारच्या महत्वाकांक्षी उद्दिष्टाला अनुसरून ग्रो-टेक सोल्युशन ऊस शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणारी नवीन मालिका सादर करण्यात आली आहे. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत या 'ग्रो-टेक सोल्युशन्स'चे अनावरण करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात, व्हीएसटी ग्रो टेक सोल्युशन सर्वप्रथम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले जाणार असून, ज्याची रचना उत्पादनाचे विश्लेषण आणि परिणामी उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने केली गेली आहे. शिवाय व्हीएसटी ग्रो टेक सोल्युशनचा उपयोग शेतकऱ्यांना कष्ट, पाणी, वेळ आणि इंधन या सगळ्यांची बचत करण्यासाठीही होणार आहे. महत्वाचे म्हणजे व्हीएसटी ग्रो टेक सोल्युशनचा सर्व आवश्यक उपकरणांसहित जमिनीवर उतरवण्याचा प्राथमिक खर्च जास्त अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरपेक्षा 50% ने कमी असण्याची अपेक्षा आहे.

व्हीएसटी ग्रो-टेक सोल्युशनच्या सादरीकरणप्रसंगी व्हीएसटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष जुझर सिंग विर्क म्हणाले, “व्हीएसटीच्या अत्याधुनिक उत्पादनांचा शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी उपयोग होईलच; शिवाय मशागत, लागवड आणि काढणी यासाठी लागणाऱ्या भांडवलात आणि कष्टात घट होईल. व्हीएसटी ग्रो-टेक सोल्युशनचा भाग म्हणून 'व्हीएसटी शक्ती विराट एम टी 270' सादर होत आहे. कमीत कमी इंधनावर चालणार छोटा ट्रॅक्टर असून, सर्वार्थाने ऊस पिकाच्या अनुषंगाने बनवला गेला आहे.

ऊस शेती करण्याच्या या नव्या पद्धतीमुळे ऊस उत्पादनात जवळपास 20% वाढ होईल. 'व्हीएसटी शक्ती एमटी 270'ची बांधणी कमी इंधन वापरणाऱ्या 4 सिलिंडर इंजिन, पॉवर स्टीअरिंग, ऑइल मध्ये बुडालेले ब्रेक्स, स्मार्ट हायड्रॉलिक्स, अल्ट्रा कूलिंग रेडीएटर, स्वयंचलित खोली आणि ड्राफ्ट कन्ट्रोल आणि गटातील सर्वोत्तम कमी टर्निंग रेडिअस असल्याने कमीत कमी इंधन वापराची खात्री देता येते. या यांत्रिकीकरण सुविधेमुळे छोट्या शेतीक्षेत्रातून येणारे कमी उत्पन्न आणि अधिक मनुष्यबळासाठी येणारा अधिकचा खर्च यातली तफावत कमी होणार आहे." 

उच्च टॉर्क असलेल्या मॉडेल ज्याचा उपयोग द्राक्षे आणि डाळिंब फवारणीच्या 600 लिटर क्षमतेच्या स्प्रेयरसाठी केला जाऊ शकतो. इंधन बचत आणि जास्त टॉर्क क्षमतेमुळे फळबागांच्या शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

व्हीएसटी ग्रो-टेकची प्रमुख वैशिष्टये:

  • नांगर, कल्टिव्हेटर, पेरणीयंत्र वापरून जमीन बांधणी खर्चात 30% बचत.
  • ऊस लागवड यंत्र वापरून ऊस लागवडीच्या खर्चात 40% बचत.
  • जमीन मशागत खर्चात पारंपरिक खर्चाच्या तुलनेत 50% बचत.
  • उत्पादनात 20% वाढ शक्य.

English Summary: VST grow tech technology for perfect mechanization in sugarcane cultivation Published on: 01 February 2020, 08:49 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters