कोरोना काळात आँक्सिजनचे महत्त्व सगळ्यांना समजले आहे. वृक्षांचे संवर्धन झाले तरच निसर्ग सुरक्षित राहू शकतो. निसर्ग सुरक्षित राहिला तरच पृथ्वीवरील प्रत्येक जीव सुरक्षित राहू शकतात. याच वृक्षांमुळे मिळणाऱ्या नैसर्गिक आनंदाची अनुभुती घ्यायची असेल तर प्रत्येकाने आवर्जून वृक्षारोपण केले पाहिजे. असा संदेश तरूणाने आपल्या लग्नातून दिला आहे.
अहमदनगर जिह्यातील जामखेड तालुक्यात हा आदर्श विवाह सोहळा पार पडला. शेतकरी पुत्र संतोष जयराम रसाळ या युवकाने आपल्या लग्नात ५०० रोपांचे वाटप केले. "झाडे लावूया झाडे जगवूया" या संदेशाने नवआयुष्याची सुरुवात गिर्हे व रसाळ कुटुंबाने केली आहे. वृक्षरोपण वाटपाने विवाह सोहळा अगदी आनंदात पार पडला. वृक्षरोपण वाटपाने हा विवाह सोहळा आदर्श विवाह सोहळा ठरला आहे. समाजाला एक नवी दिशा देण्याचे काम शेतकरी पुत्र संतोष जयराम रसाळ या युवकाने केले आहे.
संतोष रसाळ यांनी वृक्ष रोपण लागवडीसाठी जनजागृती केली आहे. रोपांचे वाटप करून नवपिढीला पर्यावरण रक्षणाचा चांगला संदेश दिला आहे. पर्यावरणात होत असलेले बदल याचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे, आणि याची जाण असणे गरजेचे असून हे प्रत्येक युवकाच कर्तव्य असल्याचे सांगितले आहे.
वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाकडे सर्व नागरीकांनी लक्ष दयायला हवे. या गोष्टीचा प्रत्येक युवकांनी आदर्श घेत पर्यावरणाच्या संतुलणाचा विचार केला पाहिजे. झाडे लावण्यास सुरुवात स्वता: पासून करून पर्यावरणाचे चांगले रक्षण करूया असा संदेश देत नागरिकांना शेतकरी पुत्र संतोष जयराम रसाळ या युवकाने प्रेरित केले आहे.
Share your comments