केंद्रीय निवडणूक आयोगाने 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवशी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डिजिटल वोटर आयडी कार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करायचे सुविधा सुरू केली आहे.
भारतातील काही राज्यात जसे की पश्चिम बंगाल, केरळ,आसाम इत्यादी राज्यात हे डिजिटल वोटर आयडी कार्ड वापरता येणार आहे..
हेही वाचा : झेरॉक्सपेक्षा काळा आलेला आधारवरील फोटो बदलायचा का ? जाणून घ्या! सोप्या पद्धती
डिजिटल वोटर आयडी कार्ड कसे डाउनलोड करायचे ते पाहू
-
सगळ्यात अगोदर https://voterportal.eci.gov.in/ या संकेत स्थळाला भेट द्या. भेट दिल्यानंतर जिथे तुमचा अकाउंट बनवा. अकाउंट बनवल्यानंतर लॉगिन करून वेबसाईटवरील e-pic हा पर्याय निवडावा.
-
हा पर्याय निवडल्यानंतर तुमचा मतदार क्रमांक टाकावा. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येतो. ओटीपी आल्यानंतर तो संबंधित वेबसाईटवर नोंदवावा.
-
त्यानंतर तुम्ही तुमचे डिजिटल मतदार कार्ड डाऊनलोड करू शकता.
यासाठी केवायसी करणे का असते गरजेचे?
काही मतदारांचे मोबाईल नंबर हे निवडणूक आयोगाचा रेकॉर्ड मध्ये वेगळे असतातआणि सध्या ते दुसरा कुठला नंबर वापरत असतात. अशावेळी केवायसी प्रक्रिया निवडावी लागते. केवायसी कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचे डिजिटल मतदार कार्ड डाऊनलोड करू शकता.
पीडीएफ स्वरूपात मिळेल डिजिटल वोटर कार्ड
नवीन काही मतदारांनीच नवीन नोंदणी केली असेल तर अशी नोंदणी केलेल्या मतदारांना दोन्ही स्वरूपाचे मतदान कार्ड मिळणार आहे. हे कार्ड आपल्याला आपल्या डीजी लॉकर मध्ये हि सेव्ह करता येऊ शकते. ज्या मतदारांचा मोबाईल क्रमांक हा आयोगाकडे रजिस्टर नाही, अशांना तो निवडणूक आयोगाकडून मोबाईल नंबर पडताळणी करून घ्यावी लागणार आहे.
Share your comments