आज कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) आहे. यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापुजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडली. ही शासकीय महापुजा संपन्न झाल्यानंतर फडणवीसांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज विठुमाऊलीची पूजा करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा अतिशय भाग्याचा योग आहे. विठ्ठल हे सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी यांचे दैवत आहे.
त्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावेत, त्यांच जीवन सुजलाम सुफलाम व्हावं, यासाठी कार्य करण्याची शक्ती आम्हाला मिळावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही नेहमीच विठ्ठलाला करत असतो असे फडणवीस म्हणाले. ही पुजा मनाला शांती देणारी असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा: धडाकेबाज कारवाई! पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याप्रकरणी कृषी सहायक, ग्रामसेवक निलंबित
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंदिर परिसरात कॉरीडॉर तयार करण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. याबाबत मी काल बैठक घेतली आहे. विकासकामं करत असताना पंढरपूरची कोणतीही परंपरा खंडीत होणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत.
कोणालाही विस्थापीत करणार नाही. मात्र, काही जागा घ्यावा लागतील, त्या जागा घेत असताना त्यांना योग्य त्या प्रकारचे पुनर्वसन करण्याची, त्यांचा व्यवसाय योग्य चालला पाहिजे यासंबंधीची काळजी घेतली पाहिजे असे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा: बेरोजगार मजुरांसाठी सरकार देणार 5000 रुपये; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
शासकीय महापुजा संपन्न झाल्यानंतर संत नामदेव महाराजांनी अवघ्या विश्वाला दिलेल्या समता, बंधुता या संदेशाला उजाळा देण्यासाठी पंढरपूर ते घुमान निघालेल्या सायकल वारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
75 वर्षाच्या भावे आज्जी देखील या सायकल वारीत सहभागी होणार आहेत. त्या 2 हजार 300 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. आज पहाटे या सायकल वारीला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी झेंडा दाखवल्यावर सुरुवात झाली.
हेही वाचा: मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही : कृषिमंत्री अब्दुल सत्तार
Share your comments