काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी थोड धीर धराव, शासन आपल्या सोबत आहे. तसेच पालकमंत्री आणि आमचे जिल्हाध्यक्ष हे सुद्धा झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत आणि यावर लवकरच तोडगा नक्कीच निघेल आणि उपाययोजनाही होतील असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रा. सौ. अनुजा सावळे पाटील यांनी दिले. त्या चिखली तालुक्यातील पेठ येथे पावसामुळे झालेल्या नुकसानाची शेतात जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेण्यासाठी दिनांक ४ ऑक्टोबर रोजी
पेठ येथे आल्या होत्या. अनुजा सावळे पाटील ( महिला जिल्हा अध्यक्ष बुलडाणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) यांनी पेठ येथे शेतकऱ्यांची भेट घेऊन स्वत; शेतात जाऊन पाहणी केली . पाहणी करत असताना पूर्ण शेतातील सोयाबीणचे पिक उध्वस्त झालेले होते. त्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान बघून खंत व्यक्त केली .
त्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या मनातल्या भावना जाणून घेतल्या . शेतकऱ्यांनी आपलं नुकसान झालं एवढी मेहनत करून तोंडाजवळ आलेला घास निघून गेला . अशा भाऊक प्रतिक्रिया दिल्या .
त्या नन्तर अनुजा सावळे पाटील यांनी शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब व प्रशासनाकडे पाठपुरावा करून शेतकरी बांधवाना न्याय मिळवून देणार अशी प्रतिक्रिया दिली . शेतामध्ये उपस्थीत काही उतरादा येथील शेतकरी व पेठ येथील शेतकरी उपस्थित होते . पुरुषोत्तम शेळके यांनी प्रतिक्रिया देऊन शेतकऱ्यांचे जास्त प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना तात्काळ मदत मिळावी अशी भावना व्यक्त केली
त्या नन्तर संतोष शेळके यांनी सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या . अनुजा सावळे पाटील पाहणी करत असताना उपस्थित कृषी सहाय्यक वाकोडे ताई , विदर्भ दूत जि. प्रतिनिधी बुलडाणा मनोज जाधव , सागर् काळे , किशोर वानखेडे , राजेंद्र पांढरे , राजेंद्र बर्वेकर , राम शेळके ,पांडुरंग कदम , उद्धव शेळके , विष्णू शेळके , मोहन शेळके आदी शेतकरी उपस्थित होते.
यावेळी सावळे यांनी आपली प्रतिक्रिया देतांना सांगितले कि, आठ दिवसाआधी झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याकरीता पेठ या गावी आली असता शेतीचे अतोनात नुकसान झालेले दिसले. यावेळी शेतकऱ्यांची व्यथा व त्यांचे प्रश्न मी ऐकून घेतल्या व कृषी सहाय्यक यांच्याशी याबात चर्चा केली. काही नियम आहेत जे बदलावे लागतील. त्याचबरोबर हा जो नदीचा प्रश्न आहे त्याचे खोलीकरण विषयी सुद्धा चर्चा झाली.
याबद्दल पालकमंत्री यांनी आदेशही दिलेले आहेत. आणि एक पदाधिकारी म्हणून याचे प्रश्न मी नक्कीच प्रशासन पर्यंत आणि पालकमंत्री यांच्या पर्यंत नेईन आणि यावरील उपाययोजना लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन दिले.
प्रतिनिधि - गोपाल उगले
Share your comments