1. बातम्या

कोविडकाळात विधवा झालेल्या महिलांसाठी साहाय्यभूत आहे वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्ध योजना

कोरोना महामारी च्या काळात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. बऱ्याच कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे कोरोनामुळे निधन झाल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानाने उपजीविका करता यावी, यासाठी ग्राम विकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी वीरभद्र काली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून त्या संदर्भातला जीआर मंगळवारी काढण्यात आला.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
courtesy-loksatta

courtesy-loksatta

कोरोना महामारी च्या काळात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. बऱ्याच कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे कोरोनामुळे निधन झाल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानाने उपजीविका करता यावी, यासाठी ग्राम विकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी वीरभद्र काली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून त्या संदर्भातला जीआर मंगळवारी काढण्यात आला.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अर्थात उमेद च्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीब आणि जोखीम प्रमाण महिलांना सन्मानाचे व सुरक्षित अशा पद्धतीने जीवन जगता यावे,याकरिता शाश्वत अशा उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून पोषक वातावरणाची निर्मिती व्हावी यासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विविध योजनांमध्ये कृती संगमाच्या  माध्यमातून योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे

याबाबतीत गावनिहाय माहिती मिळवून  एकट्या पडलेल्या विधवा महिलांना स्वयंसाहाय्यता समूहामध्ये प्राधान्याने समाविष्ट करण्यात येणार आहे.

 या योजनेच्या माध्यमातून रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या नियमानुसार किमान पाच विधवा महिला सदस्यांचा स्वतंत्र स्वयंसहायता समूह स्थापन करण्यात येणार असून अशा समूहांना उमेदच्या लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच अशा समूहातील सदस्यांना फिरता निधी व समुदाय गुंतवणूक निधी आता करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. अशा महिलांना उमेद अंतर्गत  रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राधान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

तसेच विशेष म्हणजे या महिला व त्यांच्या कुटुंबातील 18 ते 35 वयोगटातील युवक व युवतींना दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षणामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. आरसेटी योजनेअंतर्गत 18 ते 45 या वयोगटातील युवक-युवतींना दहा ते 45 दिवसांचे कृषीविषयक प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग विषयक प्रशिक्षण, उत्पादक विषयक प्रशिक्षण असे विविध व्यवसायांचे मोफत व निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. (स्त्रोत-पुण्यनगरी)

English Summary: virbhadrakali tararani swyansidh yojana for covid period wodow women Published on: 03 November 2021, 10:40 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters