यंदा अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या मराठवाड्यातील पाणी प्रश्न बिकट होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. जलसंपदा विभागाने मागणीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.
जोवर मागणी मान्य होत नाही, तोवर पुढाऱ्यांना गावबंदी व मतदानावर बहिष्काराचे ठराव घेतले जातील, अशी भूमिका जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील ग्रामस्थांनी गल्लाटी धरण संघर्ष समितीच्या नेतृत्वात घेतली आहे.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील गल्हाटी मध्यम प्रकल्प मागील ८ महिन्यापासून कोरडेठाक पडल्याने परिसरातील २५ गावांत जलसंकट निर्माण झाले आहे. यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. तसा इशारा समितीने निवेदनाद्वारे कार्यकारी संचालकांना आधीच दिला होता.
जयहिंद लोक चळवळ संस्थेच्या वतीने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान
नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गल्हाटी धरणात उपसा सिंचन योजना मंजूर करून पाणी सोडावे, अशी मागणी गल्हाटी धरण संघर्ष समितीची मागील ३५ वर्षांपासूनची आहे.
केळीच्या दराने गाठला उच्चांक, केळीला कमाल २५०० ते ३००० रुपये दर, शेतकऱ्यांना दिलासा
Share your comments