1. बातम्या

बातमी कामाची! राज्यात विलासराव देशमुख अभय योजना, थकबाकीदार वीज ग्राहकांना होणार फायदाच फायदा...

राज्यात सध्या महावितरणकडून शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे सरकारकडून अनेक योजना आणल्या जात आहेत. असे असताना आता विलासराव देशमुख अभय योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
electricity

electricity

राज्यात सध्या महावितरणकडून शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. यामुळे सरकारकडून अनेक योजना आणल्या जात आहेत. असे असताना आता विलासराव देशमुख अभय योजनेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे कायमस्वरुपी विद्युत पुरवठा खंडीत झालेल्या वीज ग्राहकांना संजीवनी मिळणार आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. या ग्राहकांच्या (Electricity Bill Arrears) थकीत रकमेमध्ये सवलत मिळणार आहे तर पुन्हा वीज जोडणी केली जाणार आहे. यामुळे ही एक फायदेशीर योजना आहे.

राज्यातील 32 लाख 16 हजार 500 वीज ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. विद्युत पुरवठा खंडीत केलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे. यासंबंधी उर्जामंत्री, डॉ. नितीन राऊत यांनी माहिती दिलेली आहे. राज्यात वारंवार मागणी करुनही वीजबिल भरले जात नाही. यामुळे राज्य सरकारने या ग्राहकांचा कायमस्वरुपी विद्युत पुरवठा खंडीत केला होता. 2021 पर्यंत अशा ग्राहकांची संख्या ही 32 लाख 16 हजार 500 एवढी होती. असे असताना आता त्यांच्यासाठी हा मोठा दिलासायक निर्णय घेतला आहे.

जे ग्राहक हे थकीत रक्कम एकरकमी अदा करतील त्यांनाच अधिकची सवलत देण्यात येणार आहे तर सुलभ हप्त्यामध्ये थकबाकी अदा करता येणार आहे. यानंतर या ग्राहकांचा विद्युत पुरवठा पुर्ववत केला जाणार आहे. योजनेचा कालावधी 1 मार्च 2022 ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत राहणार आहे. थकबाकीदार ग्राहकांनी मूळ रक्कम एकरकमी भरल्यास व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ होईल.

या योजनेत घरगुती, वाणिज्य आणि औद्योगिक ग्राहकांनाच सहभागी होता येणार आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने योजना राबवली जाणार असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांकडून काही प्रमाणात वसुलीची रक्कम मिळेल व महावितरणची आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी हातभार लागेल असा विश्वासही उर्जामंत्री, डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे.

English Summary: Vilasrao Deshmukh Abhay Yojana state will only benefit the outstanding electricity consumers ... Published on: 02 March 2022, 02:41 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters