राज्यामध्ये सध्या महावितरणच्या विरोधात मोठ्या स्वरूपात उग्र आंदोलने होत आहेत. वीज बिल थकबाकी चा प्रश्न ही महावितरणसमोरची सगळ्यात मोठी समस्या आहे.
त्यामुळे कृषी पंपाच्या थकबाकी मुक्तीसाठी शासनाने सवलत योजना जाहीर केली आहे.हे वीज बिल थकबाकी कृषि पंप पुरतीच मर्यादित नाही तर घरगुती थकबाकीचे प्रमाणहीतेवढेच आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्यातीलघरगुती थकित वीज बिलाचा प्रश्न सुटावा यासाठी राज्य सरकारने एक पाऊल पुढे उचलले असून याबाबतीत पुढाकार घेतलेला आहे.याच थकीत वीज बिलाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ही घोषणा केली असून या घोषणेमुळे विज बिल ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
थकबाकीदार वीज बील ग्राहकांनी जर एकरकमी थकबाकी भरली तर त्या थकबाकी वरील व्याज आणि विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे.राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही घोषणा लोणार येथे केली. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने ही योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेला विलासराव देशमुख अभय योजना असे नाव देण्यात आले आहे.
त्यासोबतच उच्च दाब वीजग्राहकांना एकरकमी वीजबिल भरल्यास त्यामध्ये पाच टक्के रक्कम माफ करण्यात येणार असून लघुदाब वीज ग्राहकांनी एकरकमी थकित बिल भरल्यास 10% रक्कम माफ केली जाईल. परंतु या योजनेत कृषी पंप ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा दिलासा देण्यात आलेला नाही.
Share your comments