गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला उद्योगपती विजय मल्ल्या यांना सर्वोच्च न्यायालय आज न्यायालयाच्या अवमान प्रकरणी चार महिन्यांचा तुरुंगवास आणि दाेन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठाेठावली आहे. ते देश सोडून पळून गेले आहेत. कर्ज बुडवल्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. किंगफिशर एअरलाईन्स यामुळे रसातळाला गेली. अनेक बँकांची सुमारे 9 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप मल्ल्या यांच्यावर आहे.
अनेकदा विजय मल्ल्या लंडनमध्ये रोडवर देखील दिसले होते. कधी मेट्रोमध्ये तर कधी मॅच बघतानाचे त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. दरम्यान, न्यायालयीन आदेश धाब्यावर बसवून आपल्या मुलांच्या नावावर 4 कोटी डॉलर्स पाठविल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्या यांच्याविरोधात अवमानना खटला चालविला होता. याची सुनावणी चालू होती. 2017 मध्येच याबाबत आरोप सिद्ध झाला होता.
असे असताना मात्र या निकालाचा पुनर्विचार करण्यात यावा, अशा विनंतीची याचिका मल्ल्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. याचिका सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली फेटाळून लावली होती. त्यानंतर गत फेब्रुवारी महिन्यात न्यायालयाने दोन आठवड्यात स्वतः हजर राहून बाजू मांडण्याचे निर्देश मल्ल्या यांना दिले होते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
शेतकऱ्यांनो भातशेतीत सोडा मासे, आधुनिक तंत्रामुळे शेतकरी कमवत आहेत लाखो रुपये..
मात्र आता त्यांना चार महिन्याचा कारावास आणि दाेन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. यामुळे मल्ल्या भारतात कधी येणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या संपत्तीचे देखील निलाव करायचे आहेत. यामुळे आता न्यायालय काय निर्णय घेणार यावर सगळं गणित अवलंबून आहे.
महत्वाच्या बातम्या;
जनधन खातेदारांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकार देणार 3 हजार रुपये
या गोष्टी कधीही चहासोबत खाऊ नका, आरोग्यासाठी आहे खूपच धोकादायक
काय सांगता! शाळांमध्ये रविवार ऐवजी शुक्रवारी सुट्टी
Share your comments