Vikram Gokhale : मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. मराठीसह बॉलीवुडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारे दिग्गज अभिनेते आणि आवाजाचे बादशाह विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 76 वर्षांचे होते.
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
विक्रम गोखले हे मराठी तसंच हिंदी चित्रपटसृष्टीतलं एक मोठं नाव. त्यांनी अनेक मराठी,हिंदी सिनेमा, मालिकांसह रंगभूमीवरही आपल्या अभिनयाची छाप उमटवली. पण, आज या अभिनेत्यानं चाहत्यांमधून एक्झिट घेतली आणि अनेकांच्याच डोळ्यात अश्रू उभे राहिले.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये शनिवारी सायंकारी 4 वाजण्याच्या सुमारास गोखले याचं पार्थिव ठेवण्यात येणार असून सायंकाळी 6 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि रुपेरी पडदा अशा तिन्ही माध्यमांत काम केलं आहे. अभिनयासह त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरादेखील सांभाळली आहे. 2013 साली प्रदर्शित झालेल्या 'अनुमती' या सिनेमातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
Share your comments