मित्रांनो आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक अजिबोगरीब घटना पाहत असतो. अशा घटना ह्या खुप आश्चर्यकारक असतात तसेच आपल्याला विचार करायला लावणाऱ्या असतात. अशीच एक घटना समोर आली आहे, हि घटना बघायला गेलं तर थोडी विचित्रच आहे आणि हि घटना नक्कीच आपल्याला आश्चर्याचा धक्का देणारी आहे.
हे प्रकरण आहे एका शेतकऱ्याचे, ह्या शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे, हि तक्रार चोरी अथवा मारपीट संदर्भात नसून म्हैस दुध देत नाही म्हणून केली गेली आहे. ऐकून बसला ना शॉक! आहे ना हि घटना आश्चर्यकारक. हा पशुपालक शेतकरी भिंड जिल्ह्यातील नया गाव येथील रहिवाशी आहे. म्हैस दुध देत नाही म्हणून हा शेतकरी कंप्लेंट करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला
मध्यप्रदेश राज्यमधील भिंड जिल्ह्यातील बाबुलाल जाटव एक पशुपालक शेतकरी आहेत. बाबुलाल हे आपली म्हैस दुध देत नाही म्हणून आपल्या म्हशीला घेऊन जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि त्याची म्हैस दूध देण्यास नकार देत असल्यासंबंधी तक्रार केली. तसेच बाबुलाल यांनी सांगितले की त्यांची म्हैस हि जादूटोण्याच्या प्रभावाखाली असल्याचा त्याला संशय आहे. बाबुलाल ह्यांचा नायगाव गावात पोलिसांची मदत घेत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील समोर आला आहे. तेव्हापासुन हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.
45 वर्षीय बाबुलाल यादव यांना आपली म्हैस जादूटोणाच्या प्रभावात असल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले आणि त्यामुळे त्यांनी पोलिसात कंप्लेंट केली. बाबुलाल ह्यांनी पोलिसांनी कडे मदत मागितली, आणि पोलिसांनी बाबुलाल ह्यांना मदतीचे आश्वासन दिले. पोलिसांच्या सांगण्यानुसार पशु विशेषज्ञानी बाबुलाल ह्यांच्या म्हशीचे उपचार केलेत आणि म्हैस हि आधीसारखीच दुध दयायला लागली. बाबुलाल ह्यांनी मदत केली म्हणुन पोलिसांचे आभार मानलेत.
Share your comments