1. बातम्या

वनामती व रामेति देणार महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षण! कृषीयोजनांची होईल योग्य अंमलबजावणी

राज्यातील कृषी विभागातीलआणि कृषी संलग्न विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अर्थात वनामती आणि प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अर्थात रामेती या दोघीसंस्था आता महिला शेतकरी,शेतकरी आणि शेतमजूर यांना कृषी विषयक कौशल्य प्रशिक्षण देणार आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the women

the women

राज्यातील कृषी विभागातीलआणि कृषी संलग्न विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अर्थात वनामती आणि प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अर्थात रामेती या दोघीसंस्था आता महिला शेतकरी,शेतकरी आणि शेतमजूर यांना कृषी विषयक कौशल्य प्रशिक्षण देणार आहे.

मंगळवारी व्हीसी द्वारे मुंबई येथे झालेल्या बैठकीत  या विषयाला मान्यता देण्यात आली.या बैठकीचे अध्यक्ष कृषी मंत्री दादा भुसे होते.

 या प्रशिक्षणाच्या माध्यमातून कृषी योजनांच्या महिलांना अधिकाधिक लाभ होईल व त्यांना प्रगतीच्या दिशेने देण्यासाठी देखील या प्रशिक्षणाचा लाभ होऊ शकतो. अशा आशयाचे मत  सहभागी सर्व सदस्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्रात कृषी विभागाचे सात प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र  असून नागपुरात राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्रेआहे.

यामध्ये 125 कर्मचारी असून या प्रशिक्षणात 50% अधिकारी व कर्मचारी आणि 50 टक्के शेतकरी व महिला शेतकऱ्यांचा समावेश राहील.यामध्ये 25 टक्के महिला व 25 टक्के पुरुष शेतकरी राहतील.कृषी विभागाचे कर्मचारी व अधिकारी गावागावात जाऊन शेतकर्‍यांना या बाबतीत मार्गदर्शन करतात.या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची भाषा ही प्रमाणभाषा असल्यामुळे शेतकऱ्या पर्यंत परिणामकारकरीत्या सांगायचे ते पोहोचत नाही. याउलट शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांगितले तर ते चटकन समजते.ही बाब लक्षात आल्याने या विषयावर चिंतन होऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सध्या शासनाचा भरा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करणे व त्यांची प्रगती साधणे हा आहे. यासाठी बाजारपेठेचा अभ्यास करून बाजारपेठेची गरज काय आहे ते ओळखून विकेलते पिकेलही संकल्पना राबवली जात आहे. त्या अनुषंगाने महिला,शेतकरी,शेतमजूर, शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गटांना प्रशिक्षण देऊन खऱ्या अर्थाने कृषी विस्तार आतून कृषी समृद्धीची संकल्पना पुढे नेता येईल, यावर बैठकीत एकमत झाले.(स्त्रोत-दिव्य मराठी)

English Summary: vamati and rameti give training to womens farmer for effective impllemented agri scheme Published on: 13 January 2022, 05:04 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters