1. बातम्या

उत्तराखंडमधील २५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आली किसान पेन्शनची रक्कम

COVID-19 मुळे आतापर्यंत ६७ हजार जण बाधित झाले आहेत. या विषाणूचा अधिक संसर्ग होऊ नये यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान सरकार आता काही प्रमाणात लॉकडाऊन मध्ये शिथिलता आणणार आहे.

KJ Staff
KJ Staff

 

COVID-19 मुळे आतापर्यंत ६७ हजार जण बाधित झाले आहेत. या विषाणूचा अधिक संसर्ग होऊ नये यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान सरकार आता काही प्रमाणात लॉकडाऊन मध्ये शिथिलता आणणार आहे. यासह या लॉकडाऊनच्या काळात मजुरांना आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे.  सरकार सर्वप्रकारे शेतकर्‍यांच्या सबलीकरणासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. दरम्यान उत्तराखंड सरकारने शेतकऱ्यांसाठी एक सुखद बातमी दिली आहे. 

Kisan Pension Scheme किसान पेन्शन योजना

त्तराखंड सरकार सर्व प्रकारे शेतकर्‍यांच्या सबलीकरणासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. या अनुक्रमे उत्तराखंडमधील शेतकरी शेतकरी पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात. अहवालानुसार उत्तराखंड राज्य सरकार शेतकर्‍यांना पेन्शन सुविधा प्रदान करते. ६० वर्ष वय असलेल्या शेतकऱ्याला सरकार दर महिन्याला एक हजार रुपये देते. राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागामार्फत ही योजना चालविली जाते. किसान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सरकारने सन २०२०-२१ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या हप्त्यात ७.६५ कोटी रुपये दिले आहेत.

आतापर्यंत ही रक्कम २५ हजार ३९७ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे.  या योजनेच्या फायद्यासाठी सरकारने काही अटीदेखील ठेवल्या आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्तराखंडचा रहिवासी असणे आवश्यक आहे. शिवाय, शेतकरी महिला किंवा पुरुष असू शकतात. लाभार्थी शेतकरी, ज्याचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा मोठे असेल त्याने आपल्या स्वत: च्या जमिनीत २ हेक्टरपर्यंत शेती करणे आवश्यक आहे.

English Summary: Uttarakhand government deposit 7 crore kisan pension amount to 25 thousand beneficeries accounts Published on: 11 May 2020, 12:27 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters