आंतरराष्ट्रीय पोटाश संस्था, स्वित्झर्लंडने कृषी जागरण च्या फेसबुक पेज वर एक विशेष रूपात भारतामध्ये हळदीच्या शेतीसाठी उपयुक्त उर्वरक पॉली हायलाईट च्या फायद्याविषयी एक लाईव्ह चर्चा केली ज्यामध्ये डॉ.आदी पेरेलमेन, इंडिया कॉर्डिनेटर, आंतरराष्ट्रीय पोटाश संस्थान आणि डॉ. पी. के. कार्तिकेयन, सहाय्यक प्राध्यापक( मृदा विज्ञान), अण्णामलाई विश्वविद्यालय यांनी भाग घेतला.
ही चर्चा तामिळनाडूच्या इरोड जिल्हा तील आंतरराष्ट्रीय पोटाय संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नामलाई विश्वविद्यालय यांच्याद्वारे केला गेलेला अभ्यासावर केंद्रित होती. या चर्चेमध्ये भारतातल्या विविध भागातील लोकांनी सहभाग नोंदवला. या लेखात आपण पॉली हायलाईट बद्दल माहिती घेऊ.
काय आहे पॉलीहैलाईट?
हे एक समुद्राच्या खोल भागात 260 मिल्लियन वर्ष अगोदर जमा झालेल्या खडकांमध्ये इंग्लंडच्या उत्तर पूर्वी समुद्र सपाटीपासून बाराशे मीटर खोल भागात सापडते हे एक क्रिस्टल असून त्याच्यातील सर्व घटक हे एका स्वरूपात हळूहळू रिलीज होतात. याच्यातील पोषकतत्वे विरघळल्यानंतर माती सोबत वेगवेगळ्या प्रक्रिया करते. पॉली हायलाईट च्या वापरामुळे पिकांमधील सल्फर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ची आवश्यकता आणि पिकांमधील कमी पुर्ण केली जाते.
भारत हळद उत्पादनात आणि निर्यातीत जगात अव्वल क्रमांकावर आहे. भारतामध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिसा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, मेघालय, महाराष्ट्र आणि आसाम या राज्यांमध्ये हळद उत्पादन घेतले जाते. हळद शेतीला पोटॅशियम ची आवश्यकता असते. त्यासोबतच हळदीचे उत्पन्न आहे हळदीच्या जाती सोबतच माती आणि पिकाच्या वाढ होण्याच्या दरम्यान वातावरणाची स्थितीवर अवलंबून असते.
हळदीच्या शेतीसाठी 25 ते 39 डिग्री सेल्सिअस तापमान ची आवश्यकता असते. त्यासोबतच पंधराशे मिलिमीटर पाऊस पडेल अशा सिंचन परिस्थिती असलेल्या ठिकाणी हळदी शेती केली जाते. हळद लागवडीसाठी मातीचा सामू हा 4.5 ते 7.5 पीएच असावा तसेच जमीन चांगली पाण्याचा निचरा होणारी असावी. हळदीसाठी नायट्रोजन आणि फॉस्फरस यांच्याऐवजी पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सल्फर ची आवश्यकता असते त्यामुळे हळद पिकासाठी पोली हायलाईट वापरणे फायद्याचे ठरेल.
पॉलीहैलाईट मध्ये असलेली पोषकतत्वे
1-46 टक्के सल्फर ट्रायऑक्साईड सरकारचा चांगला स्रोत आहे. हा घटक मातीत असल्यामुळे अन्य पोषक घटक जसे की नायट्रोजन आणि फॉस्फरस यांच्या प्रभावकारी वापर करता येतो.
2-13.5 टक्के डाय पोटॅशियम ऑक्साईड वनस्पतींच्या संपूर्ण वाढ आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
3-5 टक्के मॅग्नेशियम ऑक्साईड प्रकाश संश्लेषण क्रिया साठी आवश्यक आहे.
4-5 टक्के कॅल्शियम ऑक्साईड वनस्पतीतील कोशिका विभाजन आणि मजबूत कोशिका भित्ती यासाठी उपयोगी आहे.
पॉलीहैलाईट वापराचे फायदे
- हे एक प्राकृतिक खनिज ( डाय हायड्रेट पॉली हायलाईट ) आहे. त्यामध्ये चार प्रमुख पोषक घटक तत्त्वे आहेत. पोटॅशियम, सल्फर, कॅल्शियम आणि मॅग्नेशिअम या मध्ये आढळते.
- हे क्रिस्टल स्वरूपात असल्यामुळे पाण्यात ते हळूहळू विरघळते तसेच मातीत देखील पोषक तत्त्वे हळूहळू सोडते. त्यामुळे जास्त काळापर्यंत पोषक घटक मातीत टिकून राहतात.
- हे आधीचे गुणवत्ता आणि उत्पन्न यामध्ये वाढ करते.
प्रयोग:
अण्णा मलाई विश्वविद्यालय तामिळनाडू द्वारा आंतरराष्ट्रीय पोटाशी संस्थान स्वित्झर्लंड यांच्या संयुक्त विद्यमाने तामिळनाडू राज्यातील इरोड जिल्ह्यात हळदीच्या उत्पादनात पोली हायलाईट च्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी वर्ष 2019 -20 मध्ये पॉट कल्चर आणि 2020 ते 21 शेतामध्ये प्रयोग केला गेला. या अभ्यासात हळदीतील राईजोम, क्लोरोफिल तसेच कर्क्युमिन यांच्या मात्रेत आणि उत्पन्नात होणारा परिणाम यांचा अभ्यास केला गेला.
या अभ्यासाचे परिणाम:
- हळद पिकात पोटॅशियम च्या उपयोगामुळे फारच चांगले आणि महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळाला.
- याच्या वापरामुळे रायझोम च्या उत्पन्नात वाढ झाली.
- पोटॅशियम च्या वापरासाठी एमओपी आणि पोली हायलाईट यांच्या वेगवेगळ्या प्रमाण 1:1 किंवा 2:1 किंवा 1:2 चहा प्रयोगामध्ये फक्त एम ओ पी च्या तुलनेत जास्तीची रायझोम उत्पन्न मिळाले.
- पोटॅशियम च्या वापरामुळे हळदीच्या च्या उत्पन्नात झालेली वाढ ही मातीतील पोटॅशची कमतरता दर्शवते.
Share your comments