नवी दिल्ली: केंद्रीय कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने महालनोबीस राष्ट्रीय पिक अनुमान केंद्राच्या सहकार्याने विविध राज्यांमध्ये पिक काढणीबाबत प्रायोगिक तत्वावर प्रयोग केले. खरीप हंगाम 2018 आणि रब्बी हंगाम 2019 या कालावधीत प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या या प्रयोगात 8 संस्था सहभागी झाल्या होत्या.
या प्रयोगिक अध्ययनानंतर असे आढळले की पिक काढणी प्रयोगात संबंधित प्रदेश आणि पिक यांच्यानुसार पिक कापणी विषयक अनुमानातील आकडेवारीच्या चुकांमध्ये 30 ते 70 टक्के कपात होण्याची शक्यता असते. या निष्कर्षानंतर केंद्र सरकारने पिक काढणी प्रयोगासाठी स्मार्ट सॅम्पलिंग तंत्रज्ञान 9 राज्यातल्या 96 जिल्ह्यात अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. 2019च्या खरीप हंगामातल्या धान पिकासाठी हे तंत्रज्ञान वापरल जाईल. यासाठी उपग्रहावरुन मिळालेल्या माहितीचा आधार घेत स्थळ निवडले जाईल.
पिकाचे एकूण उत्पादन मोजण्यासाठीची सॅटेलाईट, कृत्रिम बुद्धीमत्ता, मशीन लर्नींग सारख्या तंत्रज्ञानाच्या सहकार्याने सांख्यिकीय पद्धत वापरण्याचा प्रयोग यशस्वी झाला तर तो प्रयोगही सगळीकडे वापरात आणता येईल. कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.
Share your comments