जर तुम्ही बँकेत खातं उघडण्यासाठी उघडण्यासाठी गेलेत तर तुम्हाला माहिती आहे आधार कार्ड किती महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. तसेच नवीन सिम कार्ड घेण्यासाठी, इन्कम टॅक्स फाईल करण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता भासते. तसेच आधार कार्ड संबंधित विविध प्रकारच्या सेवा मिळवण्यासाठी आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर अपडेट असणे फार गरजेचे असते. कधी-कधी आपल्याला आपला नवीन नंबर द्यावा लागतो. नवीन नंबरला सर्व बँक अकाउंटच्या सोबत आधार कार्ड सोबतही लिंक करणे आवश्यक आहे.
तुम्हाला माहिती आहे की, भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण अर्थात युआयडीएआय भारतीय नागरिकांना 12 अंकी ओळख क्रमांक आधार कार्डद्वारे लागू करतात. यासोबतच आपले नंबर, पत्ता, नाव इत्यादी विवरण बदलण्याची परवानगी देते. आधार कार्डमध्ये विविध प्रकारचे बदल करण्यासाठी आपल्याला बर्याच प्रकारच्या कागदपत्रांची गरज असते. परंतु आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता नसते.
आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर अपडेट किंवा बदल करण्याची प्रक्रिया
- यूआयडीएआयच्या वेबसाईटवर आपल्या जवळच्या एन्रोलमेंत सेंटरला शोधा.
- आपल्याला मिळालेल्या अपॉइंटमेंट तारखेनुसार आधार सेवा केंद्रावर जावे.
- अगोदर आपल्या जवळच्या आधार सेवा केंद्राकडून आपल्या सोयीनुसार ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी.
- आधार एनरोलमेंट सेंटर गेल्यानंतर आधार अपडेट फॉर्म भरावा.
- मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रूफ द्यायची गरज नसते.
- तुम्ही तुमच्या फॉर्म भरून एक्झिटकडे जमा करावा. त्यानंतर एक अल्प फी भरावी लागते.
- त्यानंतर तुम्हाला अकनौलेजमेंट स्लिप दिली जाते. त्या स्लिपवर यु आर एन नंबर असतो. या नंबरचा वापर तुम्ही आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी करू शकता.
Share your comments