उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि यूपीए सरकारमध्ये मंत्री राहिलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते आरपीएन सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात जाऊन पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का मानला जात आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या तारखा अगदी जवळ आल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांची तयारी सुरू असून उत्तर प्रदेशच्या राजकारणात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. अनेक नेत्यांची पक्षांतरं सुरू आहेत. भाजपाच्या अनेक विद्यमान आमदारांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला. तर इतर पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळाले. काँग्रेसचे स्टार प्रचारक आरपीएन सिंह यांचा भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
आरपीएन सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजीनामा पाठवला आहे.आरपीएन सिंह यांनी लिहिले आहे कि, “आज, जेव्हा संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे, तेव्हा मी माझ्या राजकीय जीवनात एक नवीन अध्याय सुरू करत आहे. मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देत आहे. मला देश, जनता आणि पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.
Share your comments