अनेक भागात कालपासूनच ढगाळ वातावरण आहे. काल दुपारच्या सुमारास काही ठिकाणी अवकाळी पावसाने ( Unseasonal Rain ) हजेरी लावली आहे. झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काढणीला आलेली पिके धोक्यात येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची (Farmer) चिंता वाढलीय. अनेक पिकांना तसेच फळबागांना रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या काही भागांमध्ये रात्री अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे संत्रा,आंबा ह्या फळबागेचे नुकसान झाले आहे. उभा असलेल्या गहू, हरबऱ्यासह इतर पिकांचे ही मोठे नुकसान झाले आहे. काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. हवामान विभागाने येणाऱ्या काही दिवस देशातील अनेक राज्यात मुसळधार आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
पुढील काही दिवस उत्तर-पश्चिम भारतात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहू शकते. अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. गारपिटीमुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान होऊ शकते. पावसामुळे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार नाही. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे. आज देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
महात्मा जोतीराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण १.५० लाखांहून ५ लाख रुपये मिळणार
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अर्धापुर तालुक्यातील आंबेगाव,चनापूर, पाटणूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळं झाडे उन्मळून पडली आहे. केळीच्या बागांना मोठा फटाका बसला.
शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत वीज उपलब्ध करून देणार! फडणवीसांची माहिती
नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर, मुदखेड तालुक्यात सायंकाळी जोरदार गारपीट झाली. गारपिटीमुळं रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ज्वारी, गहू, हरभरा, करडी यासारख्या काढणीला आलेल्या पिकांना पावसामुळं फटका बसला आहे.
भटक्या गायींपासून सुटका होणार, गोशाळा करू शकतील नवीन व्यवसाय, नीती आयोगाची नवीन योजना
मोठी बातमी! भाजपच्या ताब्यात असलेल्या साखर कारखान्याला जप्तीचे आदेश, काय आहे प्रकरण?
या जातीच्या कोंबडीचे संगोपन आहे फायदेशीर, एक अंडे 100 विकलं जातंय, जाणून घ्या..
Share your comments