परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 19 सप्टेंबर पासुन परभणी व हिंगोली जिल्हयातील विविध गावांमध्ये विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी उपक्रमात विशेष संरक्षण मोहिम कुलगुरू डॉ. अशोक ढवण व विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
मोहिमेंतर्गत मौजे कौडगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना प्रा. वाघमारे यांनी पिकांना रासायनिक खतांचा अतिरिक्त वापरून सेंद्रिय खते, हिरवळीचे खते, योग्य मशागत करून जमिनीची अन्नद्रव्यांची भूक भागवावी असे सांगून कापूस व सोयाबीन पिकाची सद्यपरीस्थितीत घ्यावयाची काळजी व रब्बी हंगामाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. डॉ. पुरी यांनी विद्यापीठाच्या विस्तार कार्याबाबत माहिती देऊन मका पिकावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले.
यावेळी महिला प्रगतशील शेतकरी सौ. जयश्री जामगे सह अनेक ग्रामस्थ सहभागी होते मौजे इसाद येथे श्री. रामप्रसाद सातपुते व श्री. राजाभाऊ सातपुते यांच्या पिकांची पाहणी केऊन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच गंगाखेड येथील शेतकरी श्री. पंडीत चौधरी व श्री. महाजन तसेच मौजे शिवाजीनगर येथील शेतकरी श्री. काशिनाथ निळे यांच्या शेतावर भेट देऊन कापूस पिकावरील किड व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी विभागातील श्री. मुंडे, श्री. कच्छवे, श्री. राठोड, श्री. राऊत व श्री. सोनटक्के आदींनी परिश्रम घेतले.
Share your comments