सद्यपरिस्थितीत सगळ्यात महत्वाच्या कागदपत्रांपैकी असलेल्या आधारकार्ड विषयी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ते म्हणजेच आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने कठोर पावले उचलत चक्क पाच लाख 98 हजार 999 आधार कार्ड रद्द केली आहेत.
काही काळापासून सरकारकडे डुप्लीकेट आधार कार्डच्या बाबतीत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
यासंबंधी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, डुप्लिकेट आधार कार्ड चे समस्या दूर करण्यासाठी युआयडीएआय सातत्याने पावले उचलत आहे.
याबाबत राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिलेली माहिती
हे सगळे गैरप्रकार रोखण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती देताना ते म्हणाले की, आता फेस व्हेरिफिकेशन फिचर आधार कार्ड मध्ये जोडण्यात आली आहे. म्हणजे आता आधार कार्ड व्हेरिफाय करायचे असेल तर चेहरा देखील वापरला जाणार आहे.
आतापर्यंत आधार कार्ड व्हेरिफिकेशन साठी फक्त बोटांचे ठसे आणि डोळे यांचा वापर केला जात होता. तसेच चंद्रशेखर यांनी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, आधार कार्ड संबंधी सेवांचा दावा करणाऱ्या ज्या काही बनावट संकेतस्थळ अर्थात वेबसाईट्स आहेत, अशांना यूआयडीएआय कडून नोटिसा देखील पाठवण्यात आले आहेत.
या नोटीशीच्या माध्यमातून त्यांना कोणत्याही प्रकारची सेवा देण्यास मनाई करण्यात आली आहे त्यासोबतच या वेबसाइटच्या होस्टिंग सर्विस प्रोव्हायडरला देखील सांगण्यात आले आहे की, त्या तात्काळ ब्लॉक करण्यात आले आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की यापैकी कोणत्याही वेबसाईटवर कोणत्याही नागरिकाला आधार कार्ड नोंदणी करण्याचा, बायोमेट्रिक बदलण्याचा आणि मोबाईल नंबर बदलण्याचा अधिकार राहणार नाही.
तसेच जर लोकांना त्यांच्या आधार कार्ड मधील ऍड्रेस, मोबाईल नंबर किंवा फोटो बदलायचा असेल तर त्यांना आधार कार्ड केंद्र किंवा युआयडीएआय वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
Share your comments