सध्या देशात समान नागरी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठे वक्तव्य केले आहे. याची चर्चा सध्या सुरू आहे.
रामदास आठवले म्हणाले, देशामध्ये समान नागरी कायदा झाला पाहिजे, ही सगळ्यांची भावना आहे. हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात नाही. मात्र, त्याचा काहींनी बागुलबुवा उभा केला आहे. ते चुकीचे आहे.
सरकारने आता हरकती मागविलेल्या आहेत. हा देश एकसमान राहावा, इथे सर्व जण गुण्यागोविंदाने नांदावेत, हीच एक भावना आहे. त्यामुळे येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीच्या आधीच हा कायदा लागू होण्याची शक्यता असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.
मका लागवड, संपूर्ण माहिती जाणून घ्या
तसेच ते म्हणाले, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. आर. राव यांचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष राज्यात आला आहे. मात्र त्याचा कोणताही परिणाम एनडीएवर होणार नाही.
तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांच्या पक्षाकडे पैसा आहे म्हणूनच ते त्याचा वापर करत आहेत. मात्र, त्याचा कोणताही परिणाम राज्यात होणार नाही. आम्ही जर त्यांच्या राज्यात गेलो व बॅनर लावले तर काय होईल, असा सवाल आठवले यांनी यावेळी उपस्थित केला.
राव यांचा पक्ष ही भाजपची बी टीम नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आठवले हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
पंजाबचे पशुपालक स्वच्छ व निर्भळ दूध उत्पादनासाठी काय करतात? जाणून घ्या..
मत्स्य उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक
"FRP मध्ये केलेली वाढ म्हणजे डोंगर पोखरुन हाती लागलेली उंदराची पिल्ली"
Share your comments