MFOI Update : महिंद्रा ट्रॅक्टर्सने प्रायोजित केलेल्या कृषी जागरणच्या मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया २०२३ कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. यासोबतच ते 'MFOI' ने सुरू केलेल्या किसान भारत यात्रेला देखील हिरवा कंदील दाखवणार आहे. या कार्यक्रमासाठी देशातील शेतीतून लखपती झालेले आणि शेतीत नाविन्यपूर्ण काम केलेले शेतकरी उपस्थित असणार आहेत. शेतकऱ्यांच्या अतुलणीय योगदानाची ओळख करून देण्यासाठी आणि कृषी समुदायाने बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची कबुली देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मंत्री नितीन गडकरी हे या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. त्यामुळे आगामी काळातील कृषी पद्धतींना समर्थन आणि शेतीतील इतर बाबतीत वाढ करण्यात त्यांच्या सहभाग अविभाज्य भूमिका बजावणार आहे.
“जर कृषी विकास दर १२ टक्क्यांवरून २४ टक्क्यांपर्यंत वाढला, तर लोक खेड्यातून शहरांकडे जाणार नाहीत,” असे कृषी जागरणचे संस्थापक आणि मुख्य संपादक एमसी डॉमिनिक यांच्याशी संवाद साधताना मंत्री गडकरी म्हणाले. त्याचबरोबर स्मार्ट व्हिलेजची स्थापना आणि ग्रामीण लँडस्केप बदलण्याची कल्पना त्यांनी पुढे मांडली.
MFOI किसान भारत यात्रा
MFOI किसान भारत यात्रेचे उद्दिष्ट डिसेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत देशातील जास्तीत जास्त अंतर पार करून, १ लाख पेक्षा जास्त शेतकर्यांपर्यंत पोहचणे हे आहे. तसेच ४ हजार पेक्षा जास्त ठिकाणांना भेट दिली जाणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे ही यात्रा २६ हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करणार आहे.
या यात्रेचे प्राथमिक उद्दिष्ट शेतकर्यांची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी वाढवून त्यांना सक्षम करणे आहे. त्याचबरोबर कृषी समुदायांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या वचनबद्धतेला नवीन स्वरूप देणे हे आहे.
MFOI उद्घाटन कुठे असणार?
देशाची राजधानी नवी दिल्लीतील IARI मेला ग्राउंड, पुसा येथे MFOI या कार्यक्रमाचे उद्घाटन ६ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे.
Share your comments