Crop Insurance Update : पिकविम्याबाबत केंद्रिय कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा
प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवली जाणारी योजना आहे. या अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले असेल तर शेतकऱ्यांना या योजनेतंर्गत नुकसान भरपाई दिली जाते.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विंड पोर्टलचे उद्घाटन करताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांचा पिकविमा खात्यावर जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत ५६ लाख ६० हजार शेतकऱ्यांना यांचा लाभ होणार आहे.
तसंच राज्य सरकारकडून मिळणारे प्रिमियम अनुदान भरले जात नव्हते. त्यामुळे अनेक शेतकरी यापासून वंचित राहत होते. त्यामुळे केंद्र सरकारने आज (दि.२१) ५६ लाख ६० हजार शेतकऱ्यांच्या पिकविम्याला हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे २५८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवली जाणारी योजना आहे. या अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले असेल तर शेतकऱ्यांना या योजनेतंर्गत नुकसान भरपाई दिली जाते.
English Summary: Union Agriculture Minister's big announcement regarding crop insurancePublished on: 21 July 2023, 05:07 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments