राज्यातील मजुरांच्या हाताला काम मिळावे तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील जलसंधारणाची कामे व्हावी असा उद्देश सरकारचा आहे. मात्र काळाच्या ओघात सरकारचे या योजनांकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र भंडारा जिल्ह्याने यामध्ये इतिहासच घडवलेला आहे. मजुरांच्या हाताला काम देण्यात हा जिल्हा प्रथमस्थानी राहिलेला आहे. या योजनेची जनजागृती तसेच तसेच जलसंधारणाची कामे असा दुहेरी उद्देश प्रशासनाचा आहे. भंडारा जिल्ह्यात या योजनेच्या माध्यमातून १ हजार १२२ कामे झालेली आहेत तर ८५ हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.
2 लाख 72 हजार कुटुंबाची नोंदणी :-
रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. सरकारचा उद्देश साध्य होत असून गावचा विकास सुद्धा होत आहे. भंडारा जिल्ह्यातील नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आली असून मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. भंडारा जिल्ह्यातील जवळपास २ लाख ७२ हजार ३४० कुटुंबीयांनी नोंदणी केली आहे. वर्षभरात २ लाख ३१ हजार मजुरांना काम मिळाले आहे. सध्याच्या स्थितीला ८५ हजार ५०९ मजूर रोजगार हमी योजनेच्या कामावर रुजू आहेत. रोजगार हमी योजनेत भंडारा जिल्हा राज्यामध्ये अव्वलस्थानी आहे.
गावस्तरावर कोणती कामे?
रोजगार हमी योजनामध्ये गाव शिवाराच जलसंधारणाची कामे करुन पाणीपातळीत वाढ व्हावी तसेच माती-नाला बंडींग, बांध-बंधिस्ती, नाला दुरुस्ती समावेश यामध्ये होतो. या योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला काम ही मिळते तसेच शेतीसाठी आवशयक असणाऱ्या पाणी पातळीत देखील वाढ होते. योजनेच्या सुरुवातीला कामे सुद्धा झाली मात्र मजुरांना देण्यात येणाऱ्या रोजगरकडे सरकारचे दुर्लक्ष राहिले. यामुळे कामांची संख्या कमी होत चालली आहे तर मजूर सुद्धा दुसरीकडे पर्याय शोधत आहेत.
मजुरी मात्र अत्यंल्प :-
रोजगार हमी योजनेचा उद्देश जरी चांगला असला तरी कामगारांना मजुरी कमी भेटत आहे. रोजगार हमी योजमध्ये मजुरांना मागील वर्षी २३८ रुपये भेटत होते तर यावर्षी त्यामध्ये १० रुपयांनी वाढ केलेली आहे. या योजनादरम्यान मजुरांच्या हाताला काम तरी मिळाले मात्र पोट भरेल एवढा सुद्धा दाम मजुरांच्या पदरी पडत न्हवता.
Share your comments