1. बातम्या

UN Human Rights नं केलं शेतकरी आंदोलनावर ट्विट, शेतकरी अन् अधिकाऱ्यांना दिला सल्ला

दिल्लीच्या सीमांना चौफेर तटबंदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दिल्लीबाहेर रोखण्यासाठी सरकारनं ठिकठिकाणी रस्ते बंद केले असून, आंदोलन परिसरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आलेल्या आहेत. कृषी कायद्यांविरोधातील या आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडसाद उमटले आहेत.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
शेतकरी आंदोलनावर  युएन ह्युमन राईट्सचे ट्विट

शेतकरी आंदोलनावर युएन ह्युमन राईट्सचे ट्विट

दिल्लीच्या सीमांना चौफेर तटबंदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दिल्लीबाहेर रोखण्यासाठी सरकारनं ठिकठिकाणी रस्ते बंद केले असून, आंदोलन परिसरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आलेल्या आहेत. कृषी कायद्यांविरोधातील या आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडसाद उमटले आहेत. अमेरिकन पॉपस्टार रिहाना व पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गसह अनेकांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.

रिहाना, ग्रेटा आणि मिया खलिफा यांनी ट्विट केल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे वेधलं गेलं. आता युएन ह्युमन राईट्स (UN Human Rights)नं शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट करत सल्ला दिला आहे.

हेही वाचा :शेतकरी आंदोलन : आज देशभर ‘चक्का जाम’; तीन राज्यांना आंदोलनातून वगळलं

परदेशातील नामवंतांनी केलेल्या ट्विटवरून भारतात बरंच रणकंदन सुरू आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्टपणे भूमिका मांडत उत्तरही दिले आहे.दरम्यान, आंदोलन सुरू असलेल्या परिसरामधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बॅरिकेट्स आणि खिळे ठोकून रस्ते अडवण्यात आल्याने आंदोलनकांची मूलभूत गरजांसाठी हेळसांड सुरू झाली होती. UN Human Rights युएन ह्युमन राईट्सनं ट्विट करत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

 

“आम्ही भारतातील अधिकारी व आंदोलकांना सांगू इच्छितो की, शेतकरी आंदोलनादरम्यान जास्तीत जास्त संयम पाळावा. अभिव्यक्ती अधिकार शांततापूर्ण मार्गाने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं सुरक्षित राखले जावेत. या मुद्द्यावर योग्य तोडगा काढणे सर्वांसाठी महत्त्वाचे झाले आहे,” असे UN Human Rightsने म्हटले आहे.

गाझीपूर, टिकरी आणि सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत असून, प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराने आंदोलक शेतकऱ्यांवर आरोप होत होते. त्यानंतर तिन्ही ठिकाणावरील इंटरनेट बंद करण्यात आले होते. 

त्याचबरोबर रस्तेही बंद करण्यात आले होते. त्यावर रिहानाने आपण यावर का बोलत नाही आहोत? असा सवाल उपस्थित केला होता. त्याचबरोबर ग्रेटा आणि मिया खलिफा यांनीही पाठिंबा दिला होता. त्यावरून भारतात वेगळाच वाद उभा राहिला.

English Summary: UN Human Rights tweeted on the farmers' movement, giving advice to farmers and officials Published on: 06 February 2021, 12:12 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters