युक्रेन-रशिया मध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. असे असताना आता याचा थेट परिणाम अनेक गोष्टींवर होत आहे. अनेक वस्तू आणि खाद्यपदार्थ यामुळे महाग झाले आहेत. यामुळे याची झळ सर्वसामान्य लोकांना बसत आहे. आता या युद्धाचा परिणाम गव्हाच्या दरामध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसात अहमदनगरच्या भुसार बाजारात गव्हाचा दरात 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे आता याची झळ अनेकांना बसणार आहे. तसेच खाद्यतेलाचे दर देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य कुटूंबातील आर्थिक बजेट कोलमडले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी नगरच्या बाजारात गव्हाला 1900 रुपये प्रति क्विंटल दर होता. तर आज चांगल्या प्रतीच्या गव्हाला 2200 ते 2400 रुपये दर मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. यामुळे याचा थेट परिणाम आता जाणवू लागला आहे. रशिया जगातील सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे. भारतात देखील रशियातून मोठ्या प्रमाणावर गहू आयात केला जातो. यामुळे बाजारभावात समतोल राखला जातो. असे असताना युद्धामुळे गव्हाची आवक बंद असल्याने तसेच मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात काही भागात अवकाळी पावसाने गव्हाची नासाडी झाल्याने बाजारात गव्हाची आवक घटली आहे,
यामुळे गव्हाचे दर वाढण्यामागे हीच कारणे असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अजून अनेकांचा गहू रानातच आहे. यावर्षीचा नवीन गहू बाजारात येण्यास किमान महिनाभराचा वेळ असल्याने गव्हाचे दर वाढले आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गव्हाची निर्यात वाढून गव्हाचे दर आणखी वाढू शकतात अशी शेतकऱ्यांची धारणा असल्याने शेतकरी देखील बाजारात गहू आणत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. यामुळे या परिस्थितीवर शेतकरी लक्ष ठेवून आहेत.
यामुळे येत्या काळात हे दर अजूनच वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवणाऱ्या सरकारी तेल कंपन्यांनी 4 नोव्हेंबरपासून उत्तर प्रदेशसह अनेक प्रमुख राज्यांतील निवडणुकांमुळे किमती वाढवल्या नाहीत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा संपल्यानंतर आता सरकार किमती वाढवण्याचे पाऊल उचलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही लोक किमती वाढण्याची भीतीने पेट्रोल, डिझेलचा साठा करत आहेत. तसेच घरगुती गॅसचे दर देखील वाढण्याची शक्यता आहे.
Share your comments