राज्यात मोठ्या धरणांपैकी एक असलेले उजनी धरणातील पाण्याचा रंग बदलला आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याला उग्र वास येत असून हिरव्या रंगाचे शेवाळ आले आहे. यामुळे अडचणी येत आहेत.
तसेच केमिकल मिश्रीत पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे यावर कायमचा उपाय करण्याची मागणी केली जात आहे. याठिकाणी दुर्गंधी देखील पसरली आहे.
शेतकऱ्यांनी यामुळे शेती कशी करायची असा प्रश्न उपस्थित केला आहे. पिकांची उत्पादकता देखील घटली आहे. तसेच जनावरांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे आता हे प्रदूषण कमी करण्याची गरज आहे.
'आता प्राण्यांच्या हल्ल्यात शेतीचे नुकसान झाल्यास भरपाईची रक्कम दुप्पट करणार'
हे पाणी पिण्यास योग्य नसल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. पण उजनीच्या पाण्यावरती शासनाने काहीच उपायोजना न केल्याने आता उजनी धरणाचे पाणी दुर्गंधीयुक्त आणि या पाण्याचा रंग चक्क हिरवा बनत चाललेला आहे. यामुळे मासे देखील मरत आहेत.
29 गुंठ्यांत 3 लाखांचा नफा! काकडीची शेती ठरली फायद्याची
दरम्यान, उजनी पाणलोट क्षेत्रातील गावात दुर्गंधीयुक्त वासाने नागरिक हैराण झाले आहेत. हे पाणी इतके दुशीत झाले आहे की, त्याचा इतर कामांसाठी देखील वापर होऊ शकत नाही. यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या;
नवीन वर्षांत शेतकऱ्यांना बसणार महागाईची झळ! खतांच्या किमती 40 टक्क्यानी वाढल्या
आता राजू शेट्टी करणार पालकमंत्र्यांच्या घरासमोर बिऱ्हाड आंदोलन..
हिंगोलीतील शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार, उपमुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलले असल्याची तक्रार
Share your comments