1. बातम्या

उज्ज्वला योजना : ७६.४७ लाख लाभार्थी महिलांना नाही मिळाला मोफत सिलेंडरचा पैसा

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


देशात कोरोनाचे संकट पसरत असताना सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. यावेळी केंद्र सरकारने नागरिकांची परवड होऊ नये म्हणून मार्च महिन्याच्या अखेरीस १.७ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. याच्या माध्यमातून उज्ज्वला स्कीमच्या लाभार्थी महिलांना एप्रिलपासून ते जून महिन्यापर्यंत मोफत सिलेंडर  देण्याची घोषणाही करण्यात आली होती.  या योजनेच्या मार्फत साधरण ७.५ कोटी महिल्यांच्या बँक खात्यात ९ हजार ६७० कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. परंतु  ७६.४७ लाख महिलांच्या खात्यात एक रुपयाही आलेला नाही.   दरम्यान २६ मार्चला वित्त निर्मला सीतारमण यांनी पीएम गरीब कल्याण योजनेची घोषणा  केली होती.

याच्या माध्यमातून  लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन महिन्यांपर्यंत सिलेंडरची रक्कम  ट्रन्सफर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान या योजनेतील लाभार्थी असलेल्या ७६.४७ लाख महिलांच्या खात्यात कोणतीच रक्कम आलेली नाही. यातील  ३१ लाक महिलांच्या खात्यात पैस अडकला आहे.  इकोनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार,  प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ३१ लाख लाभर्थ्यी महिलांच्या खात्यात रक्कम ट्रन्सफर झालेला नाही कारण, या लाभार्थ्याचे बँक खाते हे आधारशी लिंक नव्हते.  किंवा केवायसी अपडेट केले नसल्याने खाते निष्क्रिय करण्यात आले आहे.   दरम्यान ऑईल मार्केटिग कंपन्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ७२.९६ लाख  लाभार्थ्यांच्या खात्यात हिंदुस्तान पेट्रोलियमकडून पाठविण्यत आलेली रक्कम परत करण्यात आली आहे. तर इंडियन ऑईलकडून पाठविण्यात आलेली रक्कम २,५८, ७४६  व्यवहार पण स्थिगित झाला आहे.  भारत पेट्रोलियमचा ९२,३३१ चा व्यवहार स्थिगित झाला आहे. 

केंद्र सरकारकडून उज्ज्वला योजनेनुसार तीन महिन्यांपर्यंत सिलेंडर  मोफत दिले जात होते. त्यानंतर एका महिन्याची मुदत वाढविण्यात आली होती.  दरम्यान केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले होते की, उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत  गॅस सिलेंडर घेणाऱ्या ७.४ कोटी महिलाला तीन सिलेंडर आणि मुफ्त देण्याचा निर्णय घेतला होता.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters