1. बातम्या

उज्ज्वला योजना; लाभार्थ्यांना मिळत आहेत मोफत गॅस सिलिंडर

कोरोना व्हायसचा संसर्ग होऊ नये, यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन लागू केला. त्यानंतर काही दिवसातच गरीब लोकांसाठी अनेक दिलासादायक योजनाच्या घोषणा सरकारकडून करण्यात आल्या. यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडर देण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली होती.

KJ Staff
KJ Staff


कोरोना व्हायसचा संसर्ग होऊ नये, यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन लागू केला होता.  त्यानंतर काही दिवसातच गरीब लोकांसाठी अनेक दिलासादायक योजनाच्या घोषणा सरकारकडून करण्यात आल्या.  यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडर देण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली होती.  जर तुम्ही पण या योजनेचे लाभार्थी आहात तर आपणास ही सिलिंडर मिळणार आहे. 

या योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी सरकारने तयारी चालू केली असून सिलिंडरचा पुरवठा सुरू केला आहे.  लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे येत असून हे पैसे देऊन आपण सिलिंडर घेऊ शकता.  ज्यांची नोंद या योजनेत आहे, फक्त त्याच या योजनेचा लाभ मिळणार आहे.  लाभ घेण्यासाठी एलपीजी सिलिंडरसाठी ग्राहकांचाय मोबाईल नंबरची नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.सिलिंडरची बुकिंग करताना एक गोष्ट लक्षात असू द्या, नवीन सिलिंडर बुकिंग करताना कमीत कमी १५ दिवसांचे अंतर हवे. उज्ज्वला योजनेतून १४.२ किलोग्रॅमचे ३ सिलिंडर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेसाठी दिले जातील. एका महिन्यात एक सिलिंडर मोफत मिळणार आहे.या योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मे २०१६ रोजी उत्तर प्रदेशाच्या बलियामध्ये केली होती. ग्रामीण भागातील महिलांना याचा लाभ मिळावा असा या योजनेचा उद्देश होता. 

काय आहे उज्ज्वला योजना : द्रारिद्य रेषेखालील कुटुंबांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही योजना १ मे २०१६ पासून  सुरू केली आहे. या योजनेतून सरकार तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन देते. ही योजना केंद्र सरकारचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या मदतीने चालवली जात आहे. ग्रामीण भागात स्वंयपाक करण्यासाठी गृहणी चुलीचा उपयोग करत असतात. यातून निघणाऱ्या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असतात. पंतप्रधान उज्ज्वला योजनेमुळे महिलांना लाभ होणार असून त्यांचे आरोग्य चांगले राहणार आहे. दरम्यान कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला.

उज्ज्वला योजनेसाठी असा करा अर्ज
या योजने अतंर्गत कनेक्शन घेण्यासाठी बीपीएल कार्डधारक कुटुंबातील महिला यासाठी अर्ज करु शकते. यासाठी आपल्याला केवायसी फार्म भरून आपल्या जवळील एलपीजी केंद्रात जमा करावा लागेल.
पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा अर्जासाठी दोन पानांचा अर्ज, आवश्यक कागदपत्रे, नाव, पत्ता, जन धन बँक खाते क्रमांक, आधार नंबर, आदींची आवश्यकता असते. अर्ज करताना आपल्याला सांगावे लागेल की, आपण १४.२ किलोग्रॅमचा सिलेंडर घेणार आहोत की ५ किलोग्रॅमचा.  पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा अर्ज या योजनेच्या साईटवरुन डाऊनलोड करु शकता.

English Summary: ujjwala scheme : PMUY free lpg cylinder distribution start Published on: 10 April 2020, 05:46 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters