Solapur News : अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचं सावट आलं आहे. तर उजनी धरणातील पाणीसाठा आता मृतसाठ्यात गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लवकरच दुष्काळाला सामोरे जावे लागणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यंदा कमी पाऊस झाल्याने धरण केवळ ६० टक्के भरल्याने धरणात केवळ ९५ टीएमसी पाणीसाठा होता. यामुळे हा पाणीसाठा जानेवारी महिन्यातच मृतसाठ्यात गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लवकरच दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे.
गतवर्षी धरण १०० टक्के भरलेले
गतवर्षी उजनी धरण जानेवारी महिन्यात १०० टक्के भरलेले होते. पण यंदा ही स्थिती उलटी झाली आहे. राज्यात यंदा पाऊस कमी झाल्याने उजनी धरण ६० टक्के भरले. यामुळे धरणात एकूण ९५ टीएमसी पाणीसाठा होता. पण यातील उपयुक्त पाणीसाठा केवळ ३२ टीएमसी होता. आणि उर्वरित मृतसाठा ६३ टीएमसी होता. यामुळे उपयुक्त पाणीसाठा सध्या संपल्याने धरणात आता मृतसाठा आहे. यामुळे आता उजनी परिसरात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.
उन्हाळी पिकांवर दुष्काळाचे सावट
धरणातील पाणीसाठा मृतसाठ्यात गेल्याने पाणी कपात होण्याची शक्यता आहे. तसंच पुढील ४ महिने धरणातील पाणी पुरवून वापरावे लागणार असल्याने याचा फटका उन्हाळी पिकांना बसणार आहे. रब्बीचा हंगाम निघाला पण आता उन्हाळी हंगामात पाणी पुरते नसल्याने उन्हाळी पिके घेण्यात अडचण निर्माण होणार आहे, अशी माहिती शेतकरी देत आहेत.
दरम्यान, धरणातील उपयु्क्त ३२ टीएमसी पाणीसाठा कालवा, बोगदा, सीना-माढा योजना, पाणी आवर्तन अशा माध्यमातून सोडण्यात आले आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा जानेवारी महिन्यात मृतसाठ्यात गेला आहे. यामुळे आता जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
Share your comments