1. बातम्या

Ujani Water Stock : उजनी धरणाची ५० टक्क्यांकडे वाटचाल; शेतकऱ्यांना दिलासा

सध्या उजनी धरणात ४२ टक्के पाणीसाठा असून धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी ५० टक्के पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ४४ साखर कारखान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

Ujani Water Stock Update

Ujani Water Stock Update

Solapur News : उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. यामुळे पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. उजनी धरणात (Ujani Dam) येणाऱ्या पाण्याचा विसर्ग ४० क्युसेक पर्यंत गेला आहे. त्यामुळे उद्या (दि.३) पर्यंत उजनी धरण ५० टक्के भरण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

सध्या उजनी धरणात ४२ टक्के पाणीसाठा असून धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी ५० टक्के पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ४४ साखर कारखान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. तर, अजून काही दिवस परतीच्या पावसानं साथ दिल्यास उजनी धरण १०० टक्के भरणे देखील शक्य होणार आहे.

उजनी धरणाच्या वरच्या भागात अर्थातत पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये भरपूर पाणीसाठा झाल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग आहे. तसंच धरणलोट क्षेत्रात देखील पाऊस होत असल्याने धरण पाणीपातळी वाढ होत आहे. मात्र दोन दिवसांपासून पाण्याची हजेरी चांगली असल्याने धरणात पाण्याची आवक जास्त प्रमाणात होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने पाणीपातळी चांगली वाढत आहे. ३० सप्टेंबर रोजी धरणातील पाणीपातळी ३२.५ टक्क्यांवर होती. पण पाण्याच्या अखंड विसर्गामुळे गेल्या २४ तासांत तब्बल चार टक्क्यांनी पाणीपातळी वाढली आहे. १ ऑक्टोबरला ती पाणीपातळी ३६.९ टक्क्यांवर पोहोचली आहे.

दरम्यान,मागील काही दिवसांपासून धरणात पाणी येत नव्हते. सोलापूर जिल्ह्यात पाऊस नव्हता म्हणून विविध पक्ष, संघटना सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करत होते. जनावरांचा चारा आणि नागरिकांच्या पिण्यासाठी टँकरची मागणी जोर धरु लागली होती. तसंच सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा अशा शहरांसाठी उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी सोडण्याची वेळ आली होती.

English Summary: Ujani Dam to move towards 50 percent water stock update Published on: 02 October 2023, 11:07 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters